मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. याआधी त्यांनी दोन वेळा अंतरिम बजेटही सादर केलंय.
Nirmala Sitaraman : अर्थमंत्री सीतारमण पोहोचल्या अर्थमंत्रालयातकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. तिथून त्या राष्ट्रपती भवनात जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अर्थसंकल्पाला मंजुरी देतील. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पावर शिक्कामोर्बत झाल्यानंतर अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या काळात ९ बैठका होणार आहेत. तर दुसरा टप्पा १० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होईल.
Budget 2025 News LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करणारकेंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करणार असून यात मोठ्या घोषणांची अपेक्षा केली जात आहे. सर्वसामान्यांपासून कार्पोरेट क्षेत्राचं बजेटकडे लक्ष आहे. महागाई आणि टॅक्समधून दिलासा मिळण्यासाठी मोठ्या घोषणांची शक्यता व्यक्त केली जातेय. करात सूट दिली जाईल अशी अपेक्षा करदात्यांना आहे.