Valentine's Day DIY Gift Ideas For Loved Ones: व्हॅलेन्टाईन्स डे, म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस. या दिवशी, अनेक लोक आपल्या प्रिय व्यक्तींना गिफ्ट्स देतात. पण, यावेळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी काही खास आणि तुम्ही स्वतः बनवलेले गिफ्ट्स देण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेल्या काही सोप्या DIY गिफ्ट्ससह तुमच्या प्रेमाला एक अनोखा प्रेमाचा टच देऊ शकता.
फॉरच्युन कुकीजव्हॅलेन्टाईन्स डे निमित्त तुम्ही घरीच फॉरच्युन कुकीज बनवू शकता. हे बनवण्यासाठी तुम्हाला रंगीबेरंगी आणि पांढरे कागद, पेन आणि कात्री लागेल. पांढऱ्या कागदाची छोटी चिट बनवून त्यावर काही प्रेमाचे शब्द लिहा. आणि बनवलेल्या रंगीबेरंगी कागदाच्या फॉरच्युन कुकीज मध्ये टाका. तुमच्या पार्टनरला हे नक्की आवडेल.
हॅन्डमेड कार्डदुकानातून महागडे कार्ड्स विकत घेण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या हातांनी तयार केलेले कार्ड्स व्हॅलेन्टाईन्स डे साठी एक उत्तम गिफ्ट आहे. हे हॅन्डमेड कार्ड तुम्ही जर हार्टशेप मध्ये बनवले आणि त्यात काही प्रेमाचे संदेश लिहिले तर ते तुमच्या पार्टनरला खूप आवडेल.
पर्सनॅलिज्ड फोटो फ्रेमतुमच्या प्रिय व्यक्तीसाठी एक पर्सनॅलिज्ड फोटो फ्रेम तयार करा. त्यात तुम्ही एकत्र अनुभवलेल्या खास क्षणांचे फोटोज लावा.
हॅण्डमेड मेणबत्तीमेण आणि सुगंधी तेलांचा वापर करून तुम्ही स्वतः मेणबत्ती तयार करू शकता. तुमच्या पार्टनरच्या आवडीनुसार रंग आणि सुगंध निवडा. यामुळे गिफ्टला एक पर्सनल टच मिलेल.
मण्यांचे ब्रेसलेटमण्यांपासून बनवलेलं ब्रेसलेट एक साधं पण सुंदर गिफ्ट आहे. विविध रंगांमध्ये मण्यांचा वापर करून त्याला खास बनवता येईल. हे ब्रेसलेट बनवताना त्या व्यक्तीच इनिशिअल किंवा पूर्ण नाव त्यात बनवता येईल.
ऑरीगामी लव्ह हार्ट्ससुंदर कागदापासून हार्ट शेपचे कटआउट बनवा आणि त्यावर प्रेमळ संदेश किंवा गोड कोट्स लिहा. हे हृदय एका आकर्षक बॉक्समध्ये ठेवा व खास भेट म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला द्या.
एम्ब्रॉयडरी केलेला रुमालजर तुम्हाला एंब्रॉइडरी येत असेल, तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खास रुमाल त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यावर त्यांच्या नावाची इनिशिअल्स , प्रेमळ संदेश किंवा छोटं हार्ट काढून ते आणखी खास बनवा.