३ फेब्रुवारी २०२५ साठी सोमवार
माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२८, चंद्रोदय सकाळी १०.२७, चंद्रास्त रात्री ११.२०, भारतीय सौर माघ १४ शके १९४६.
दिनविशेष१९९४ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांचा एकाच वेळी वेध घेणाऱ्या, २५ कि. मी. पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची ओरिसातील चंडीपूर येथील केंद्रावर यशस्वी चाचणी.
१९९९ : पुण्यातील ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संगणक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सुलभ दळणवळणासाठी ‘जिस्ट मेल’ नावाची इंटरनेटवर आधारित भारतीय भाषांतील पहिली विनामूल्य ‘ई-मेल’ सेवा सुरू केली.