अभिनेता श्रेयस तळपदे याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलोक नाथचा सुद्धा खूप मोठा चाहता वर्ग आहे. पंरतु सध्या श्रेयद तळपदे आणि अलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या लखनऊमधील गोमतीनगर पोलिस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे आणि अलोक नाथ यांनी एका कंपनीच्या संस्थापकांना मिळून धोका दिल्याचं बोललं जात आहे. डबल पैसे करण्याचे आमिष दाखवून कंपनीचे 9 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप श्रेयस आणि आलोकवर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?अभिनेता श्रेयस आणि आलोक यांनी एका कंपनीचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनत डबल पैसे करुन देतो म्हणून सांगण्यात आला. यानंतर जवळपास 45 लोकांकडून पैसे घेऊन कंपनीने 9 कोटी रुपये जमा केले. एका सोसायटीमध्ये ऑफिस देखील बनवण्यात आलं. पंरतु नोव्हेंबरपासून अचानक ते ऑफिस बंद असल्यानं कंपनीचा संस्थापक आणि ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून दोन्ही अभिनेत्यांनी धोका दिल्याचं बोललं जात आहे.
फसवल्याचा गुन्हा झाला दाखलश्रेयस आणि आलोकवर लोकांना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवले गेलेल्या लोकांनी अनेक वेळा तक्रार करुनही तक्रार दाखल होत नव्हती. परंतु कोर्टात ही केस गेल्यानंतर दोघांविरोधात तपास सुरु करण्यात आला आहे.
सोसायटीचा संचालक झाला फरारया सोसायटीच्या ऑफिसमध्ये प्रचार-प्रसारावेळी अलोक नाथ आणि श्रेयस तळपदे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनले होते. त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले परंतु आता ज्याने ही स्कीम आणली तोच कार्यालयाचा कुलूप लावून फरार झाला आहे.