मुख्यमंत्री आरक्षण का देत नाहीत. आत्महत्या होत आहेत तरी मुख्यमंत्री काय करत आहेत. त्यांना आणखी किती बळी पाहिजेत, कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
Maharashtra News : मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यताआगामी काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणातील पाण्यावरून मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली असून मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, अशी मागणी केली आहे.
Mumbai Live : फेस डिटेक्ट नाही, तर मंत्रालयात कर्मचाऱ्यांनाही प्रवेश नाहीमंत्रालयात प्रवेशासाठी फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या सिस्टममध्ये चेहऱ्याची ओळख पटल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. हा नियम मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे. तर फेस डिटेक्ट न झाल्यास मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेरच थांबावेच लागेल. पण या एफआरएस प्रणालीमुळे अनावश्यक गर्दी टाळता येईल असे दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
Sanjay Raut News : अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूस असते : संजय राऊतनुकसात देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली. यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, अर्थमंत्री पदावरील व्यक्ती ही खडूसच असते. या अर्थसंकल्पात गरीबांसाठी योजना नाही. महागाई कमी झाली नाही तर मध्यमवर्गीयाचं भलं कसं होणार? असाही सवाल त्यांनी केला आहे.
Godhra Massacre News : गोध्रा हत्याकांडातील फरार आरोपी पुण्यात जेरबंदगोध्रा हत्याकांडातील फरार आरोपी पुण्यात जेरबंद झाला आहे. पुण्यातील आळेफाटा येथे पोलिसांनी कारवाई करत त्याला जेरबंद केले आहे. हा आरोपी जन्मपेठेची शिक्षा भोगत असून पॅरोलवर बाहेर आला होता. तर यानंतरच तो फरार होता.
Maharashtra Kesari 2025 : चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर काय कारवाई? शिवराज राक्षेच्या आईचा सवालमहाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पंचांना लाथ मारल्याचे आणि त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन मल्लांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. यानंतर शिवराज राक्षेच्या आईने सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी, चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर काय कारवाई करणार? गरिबांच्या मुलांवर अन्याय करता, मात्र पंचाला काय शिक्षा करणार? असा सवाल केला आहे.
Maharashtra News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावरआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुंकांच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट देखील मुंबई महानगरपालिकेसह महत्वाच्या ठिकाणी निवडणुकीत उतरणार आहे. याआधी शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असून ते येथे स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.
Kiran Samant Live : भविष्यात शत प्रतिशत शिवसेनाच : किरण सामंतरत्नागिरीत सध्या ऑपरेशन टायगर चर्चेत असून उद्योग मंत्री उदय सामंत येथे मैदानात उरले आहेत. तर राजापूर विधानसभेचे शिवसेना आमदार किरण सामंत यांनी आता राजापूरमध्ये भविष्यात शत प्रतिशत शिवसेनाच दिसली पाहिजे, असे वक्तव्य केलं आहे.
Udayanraje Bhosale Live : 'दोषींवर कारवाई झालीच पाहिजे'- उदयनराजे भोसलेसरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोणी न्यायालयासमोर सर्वच समान आहेत. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असे म्हटलं आहे.
Mahakumbh Mela Live : महाकुंभातील तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान सुरूमहाकुंभ मेळ्यातील तिसरे आणि शेवटचे वसंत पंचमीचे अमृत स्नान सुरू आहे. आज पहाटे 4 वाजेपर्यंत 16 लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले असून महाकुंभ मेळ्याचा आजचा 22 वा दिवस आहे.
Delhi Assembly Elections 2025 : 699 उमेदवार रिंगणातदिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आज समाप्त होत आहेत. बुधवारी (ता. 5) येथे 70 विधानसभांच्या जागांसाठी एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. 2696 मतदान केंद्र असून यात 13 हजार 766 बूथ आहे. मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी निवडणूक प्रशासनाने रंग कोड तयार केले आहेत.
Pune live: वाघोलीत लागलेल्या आगीच ट्रक जळून खाकPune live: वाघोली येथे रस्स्यावर उभ्या असलेल्या ट्रकला आग लागली. या आगीची कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहेत.
Maharashtra Kesari: शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांच्यावर मोठी कारवाईअहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रविवारी झाला. या स्पर्धेतील गादी विभागातील सामना सुरु असताना, स्पर्धेला गालबोट लागले आहे. महाराष्ट्र केसरीचा गतविजेता शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी गोंधळ पाहावयास मिळाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेल्या राड्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेनं पहिलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दोघांनीही पुढील तीन वर्षे कुस्ती खेळता येणार नाहीये.