Sikandar: सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटात वरुण धवनची भाची अंजिनी धवनही दिसणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, आता अंजिनीने स्वतः याची पुष्टी केली आहे की ती या चित्रपटाचा भाग आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना अंजिनी म्हणाली, "चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे आता मी त्याबद्दल बोलू शकते." तिने असेही म्हटले की तिच्या व्यावसायिक आयुष्यात सर्व काही ठीक चालले आहे आणि ती चित्रपटाच्या सेटवर आनंद घेत आहे. तिने शूटिंग सेटला आनंदाचे ठिकाण म्हटले, म्हणजेच या ठिकाणी येऊन तिला खूप आनंद होतो.
अंजिनी पुढे म्हणाली, “मी खूप आभारी आहे. मी जेव्हा जेव्हा चित्रपटाच्या सेटवर जाते, तेव्हा मी स्वतःला चिमटा काढून पाहते की हे स्वप्न आहे की नाही. माझ्यासाठी प्रत्येक दिवस असाच असतो.” सलमान खानसोबत काम करण्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी त्याची खूप मोठी चाहती आहे आणि त्यांना पाहतच मोठी झाले आहे. मला त्यांचे चित्रपट आवडतात. विशेषतः, 'पार्टनर' पासून 'मुझसे शादी करोगी' पर्यंत, ते चित्रपट जे त्यांनी आणि डेव्हिड सरांनी एकत्र केले आहेत."
अंजिनीने असेही म्हटले की जेव्हा तिला बरे वाटत नाही तेव्हा ती 'पार्टनर' पाहते आणि नंतर तिला बरे वाटते. ती शेवटी म्हणाली, “ सोबत काम करणे म्हणजे स्वप्न जगण्यासारखे आहे.
अंजिनी धवनचा पहिला चित्रपट
सप्टेंबर २०२४ मध्ये, 'बिनी अँड फॅमिली' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचे दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले होते. या चित्रपटाद्वारे अंजिनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात पंकज कपूर, राजेश कुमार सारखे स्टार्सही होते. '' हा तिच्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटात तिची भूमिका काय असेल. याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.