धक्कादायक! अभ्यासाच्या तणावातून, तर आईने मोबाईलसाठी रागावल्यानं विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल
Marathi February 04, 2025 02:24 PM

नागपूर क्राइम न्यूज: नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत विद्यार्थ्याने आत्महत्या (Crime News) केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यातील पहिल्या घटनेत आईने मोबाईलसाठी रागावल्याने एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत  आत्महत्या केली आहे. ही घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यातील 17 वर्षीय विद्यर्थिनीने ही आत्महत्या केली आहे.

तर दुसऱ्या घटनेत जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभ्यासाच्या तणावातून एका 15 वर्षीय  विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत प्रकरणाची पुढील कारवाई सुरू केली आहे. तर दोन्ही घटनेत पोलिसांनी आत्महत्येचा (Nagpur Crime News) गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या दोन घटनांनी राज्याची उपराजधानी हादरली आहे.

नागपुरात आर्थिक फसवणुकीची रक्कम तब्बल 1491 कोटी 7 लाख

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यात 2 लाख 19 हजार 047 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले असल्याचे पुढे आले आहे. यातील मुंबईत 51, 873 प्रकरणे तर पुण्यात 22, 057  प्रकरणे नोंदवली गेली आहे.

मुंबई पुणे पाठोपाठ ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीसोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे तपासात समोर. पुणे जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांची संख्या 43 हजार 802 इतकी असून त्यातील 12 हजार 115 प्रकरणं पिंपरी-चिंचवडमधील आहेत. तर फसवणुकीची रक्कम 3 हजार 291 कोटी २५ लाख इतकी आहे.

पुणे ग्रामीण भागात आर्थिक फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानाचा आकडा 434 कोटी 35 लाख इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात आर्थिक गुन्ह्याची तब्बल 35 हजार 388 प्रकरणं गेल्या वर्षभरात नोंद झाली आहेत. यापैकी ठाणे शहरात 20 हजार 892, नवी मुंबईत 12 हजार 260 तर ठाणे ग्रामीणमध्ये 1236 प्रकरणांची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आर्थिक फसवणूक गुन्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या रकमेचा आकडा 8 हजार 583 कोटी 61 लाख आहे.

मीरा भाइंदर आणि वसई-विरारमध्ये एकूण 11 हजार 754 आर्थिक फसवणुकीचे प्रकार नोंद झाले असून त्यातून 1431 कोटी 18 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात शहरात आर्थिक फसवणुकीचे 11 हजार 875 गुन्हे नोंद झाले आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये हीच संख्या 1620 इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीतून नुकसान झालेली रक्कम 1491 कोटी 7 लाख इतकी असल्याचे पुढे आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.