अकोल्यात भरधाव ट्रकची बाइकला धड़क दिल्याने एका 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मुलगी तिच्या वडिलांच्या बाइकवरुन जात असतांना भरधाव येणाऱ्या ट्रकची बाइकला धड़क बसली आणि मुलगी धक्कालागून खाली पडली आणि ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना रविवारी रात्री दर्यापुर मार्गावर घडली. निधि जयस्वाल असे या मुलीचे नाव आहे.
ALSO READ:
निधि तिच्या वडिलांच्या सोबत बाइकरुन जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने बाइकला धड़क दिली. धड़क लागल्यावर निधि खाली रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून तिथून पसार झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक ताब्यात घेतला.अपघाताच्या काही तासानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले.
ALSO READ:
पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीला न्यायालयात लवकरच हजर केले जाण्याचे पोलिसांनी सांगितले. मयत निधिच्या कुटुंबात तिच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.Edited By - Priya Dixit
ALSO READ: