स्वयंपाक करताना अनेकदा आपल्या हातून कधी मीठ जास्त पडते तर कधी तिखट अधिक होते. अशावेळी काय करावे? असा बऱ्याचदा प्रश्न पडतो. महत्त्वाचे म्हणजे नेमके काय केले तर काय होईल हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्या समोर मोठी समस्या निर्माण होते. जर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल तर आज आम्ही काही टिप्स शेअर करणार आहोत. ज्यामुळे तुमचा स्वयंपाक बिघडलेला पुन्हा एकदा चवदार होऊ शकतो. चला तर पाहुया अशाच काही महत्त्वाच्या ट्रिक्स, ज्यामुळे तुमचा स्वयंपाक उत्तम होईल.
हेही वाचा - शिल्लक भात आणि चपातीपासून तयार करा ‘या’ स्वादिष्ट गोड डिश
जेवणात कमी मीठ पडले तर आपण ते वरुन घेऊन तो पदार्थ खाऊ शकतो. पण, जर जास्त मीठ पडले तर तो पदार्थ सेवन करण्याची देखील इच्छा होत नाही. अशावेळी काय करावे? असा अनेकांना प्रश्न पडतो. जर तुमच्या भाजीत एखाद्या वेळेस जास्त मीठ पडले तर त्यात तुम्ही उकडलेला बटाटा घालू शकता किंवा कणकेचा छोटा गोळा देखील घालू शकता. बटाटा आणि कणकेचा गोळा मीठ शोषून घेतो. त्यामुळे तो आठवणीने बाहेर काढून टाका. जर सुक्या भाजीत मीठ जास्त पडले असेल तर तुम्ही भाजलेले बेसन किंवा दाण्याचा कूट घालू शकता.
हेही वाचा : सामोसाच नाही तर 'हे' पदार्थ आले तरी कुठून ?
बऱ्याचदा बाहेरचे न्यूडल्स हे मोकळे असतात. पण, तेच तुम्ही घरी केले तर ते चिकट होतात. अशावेळी काय करावे, असा प्रश्न पडतो. जर शेव किंवा पास्ता करताना शेव चिकट झाल्यास त्यात थोडे तेल घालावे आणि ते न्यूडल्स लगेचच थंड पाण्यातून काढून घ्यावे. यामुळे ते मोकळे होण्यास मदत होते.
हेही वाचा - शिल्लक भात आणि चपातीपासून तयार करा ‘या’ स्वादिष्ट गोड डिश
अनेकदा आपण स्वयंपाकात लसणाचा वापर करतो. परंतु, हवा तसा लसणाचा स्वाद येत नाही. अशावेळी लसूण कापून घालण्याऐवजी ठेचून किंवा किसून घालावा. यामुळे लसणाचा चांगला स्वाद येतो.
अनेक महिलांची तक्रार असते ती त्यांचा भात शिजवल्यानंतर चिकट होतो. मोकळा होत नाही. अशावेळी तुम्ही भात शिजवताना त्यात थोडे तूप घाला. किंवा लिंबाचे काही थेंब घालून तांदूळ ढवळा आणि मग भाज शिजवा. यामुळे भात चांगला मोकळा होण्यास मदत होते.
हेही वाचा : कांदा, लसूणचा वापर न करता करु शकता चमचमीत रेसिपी
लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाच्या साली देखील किसून घालाव्यात. यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल. तसेच लिंबाच्या सालातील सत्त्व ही आपल्याला मिळेल.
अनेकदा सुकामेवा बऱ्याच दिवसांपासून ठेवल्यास त्याला बुरशी लागते आणि त्याची पावडर होते. अशावेळी सुकामेवा नेहमी एअर टाईट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा.
हेही वाचा : उन्हाळ्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर ‘या’ कूल कॉकटेल रेसिपी ट्राय करा
जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांड खराब झाल्यास ते स्वच्छ करणे कठीण जाते, असे झाल्यास चहा करून उरलेल्या चोथा आणि पाणी त्या भांड्यात काहीवेळ घालून ठेवा. त्यानंतर भांड अगदी चमकेल.
हेही वाचा : मुंबईतील 'हे' चविष्ट पदार्थ तुम्ही घरच्या घरी ही करु शकता
अनेकदा आपण पाहुणे जेवायला येणार म्हणून आधीच कोशिंबीर करुन ठेवतो. पण, ती बरेचदा आंबट होते. हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका. ज्यावेळी तुम्ही कोशिंबीर सर्व्ह कराल त्यावेळी त्यात मीठ घाला.
आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थ अधिकच रुचकर होतात. त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते. जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही.
हेही वाचा : Coffee Smoothie Recipe : घरच्या घरी तयार करा 'कॉफी स्मूदीज' रेसिपी