चीन आणि हाँगकाँगकडून येणारे पार्सल स्वीकारणे अमेरिकन पोस्टल सेवेनी थांबवले आहे.
अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवर 10 टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लावल्यानंतर अमेरिकन पोस्टल सेवेने पार्सल स्वीकारणे काही काळासाठी थांबवले आहे.
पत्रांची सेवा सुरू राहील असेही पोस्टल सेवेनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती.
पण सीमा भागावरील सुरक्षा बळकट करू असं आश्वासन दिल्यानंतर ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याचा निर्णय तूर्तास थांबवला.
(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)