माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत. त्यांच्या बंगल्याची झाडाझडती सुरु आहे.
सकाळी सहा वाजल्यापासूनचसंजीवराजे नाईक निंबाळकरांच्या बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. बंगला परिसरात पोलिस पथक तैनात आहे.