डिझेल इंजिन बनवणाऱ्या कंपनी जारी केला १८ रुपयांचा लाभांश; तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात २१.८ टक्क्यांनी वाढ
मुंबई : डिझेल आणि पर्यायी इंधन इंजिन बनवणारी कंपनी कमिन्स इंडियाने बाजार बंद झाल्यानंतर त्यांचे आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने ९०० टक्क्यांचा लाभांश देखील जाहीर केला आहे. कमिन्सने नफा आणि ऑपरेटिंग नफ्याच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. म्हणजेच नफा १२ टक्क्यांनी तर ऑपरेटिंग नफ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी व्यापार सत्रात कंपनीचा शेअर दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. १८ रुपयांचा लाभांश जाहीरCummins India Ltd च्या नियामक फाइलिंगनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने २ रुपये प्रति शेअर दर्शनी मूल्य असलेल्या २७ कोटी ७२ लाख इक्विटी शेअर्सवर १८ रुपये प्रति शेअर (९०० टक्के) अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. अंतरिम लाभांश ३ मार्च २०२५ पर्यंत दिला जाईल. ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५५८.४६ कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते ४९८.९१ कोटी रुपये होते. महसूल २१.८ टक्क्यांनी वाढलाशेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कमिन्सचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर २,६४०.७७ कोटी रुपयांवरून ३,२०७.५४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च २,०४७.६१ कोटी रुपयांवरून २,५५०.८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा ५९७.५७ कोटी रुपये होता. तसेच, कंपनीचे EBITDA मार्जिन २१.२ टक्क्यांवरून १९.४ टक्क्यांवर घसरले आहे. कमिन्सचा स्वतंत्र महसूल २१.८% वाढून ३,०८६ कोटी रुपये झाला. कमिन्स इंडियाच्या शेअर्सची कामगिरीबुधवारी व्यापार सत्रादरम्यान कमिन्स इंडियाचे शेअर्स बीएसईवर २.३१ टक्के किंवा ६६ अंकांच्या वाढीसह २९१९.४५ रुपयांवर बंद झाले. कंपनीचा एनएसईवरील शेअर २.५४ टक्के किंवा ७२.५० अंकांनी वाढून २,९२६ रुपयांवर बंद झाला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४,१७१.९० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक २,२९१.०५ रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचा शेअर १६.३५ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या एका वर्षात शेअरने २४.५० टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल ८१.११ हजार कोटी रुपये आहे. कंपनी काय काम करते?कमिन्स इंडिया लिमिटेड ही अमेरिकेच्या कमिन्स इंक. ग्रुपची कंपनी आहे. ती २.८ ते १०० लिटर पर्यंतचे डिझेल आणि पर्यायी इंधन इंजिन, ३००० किलोवॅट (३७५० केव्हीए) पर्यंतचे डिझेल आणि पर्यायी इंधन असलेले पॉवर जनरेटर सेट, तसेच संबंधित घटक आणि तंत्रज्ञान डिझाइन, उत्पादन, वितरण आणि सेवा देते.