26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यातील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची कारवाई
Marathi February 08, 2025 12:24 AM

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एड Action क्शन: मनी लाँडरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणांमध्ये अनेक उच्च-प्रोफाइल कंपन्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ED ने Vuenow Marketing Services Ltd आणि त्याच्याशी निगडित इतर लोकांवर ताशेरे ओढत, 178.12 कोटी किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच 26 अलिशान वाहनं देखील जप्त करण्यात आली आहेत. ही कंपनी नोएडामध्ये आहे.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत ED ने  Vuenow Marketing Services Ltd वर मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईत 6 स्थावर मालमत्ता, 73 बँक खात्यांमधील ठेवी आणि 26 आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही मालमत्ता आणि बँक शिल्लक Vuenow Marketing Services Ltd च्या मालकीची आहे. त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या नावावर ही संपत्ती होती.

कोणत्या प्रकरणी ईडीने केली कारवाई

Vuenow Marketing Services Ltd या कंपनीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले आहेत. कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आणि तो अनेक खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याचा संशय आहे. ईडी या प्रकरणाचा बराच काळ तपास करत होती. आता पुराव्याच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच अनेक हाय-प्रोफाइल कंपन्या आणि व्यक्तींच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. गेल्या वर्षीही अनेक व्यापारी समूह आणि राजकीय व्यक्तींची हजारो कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

गोठवलेल्या खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरु

याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे. लवकरच इतर मालमत्ता आणि संबंधित व्यक्तींवरही कारवाई केली जाऊ शकते. गोठवण्यात आलेल्या बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काळा पैसा आणि मनी लाँड्रिंगविरोधात सरकार आणि अंमलबजावणी संस्था कडक भूमिका घेत असून येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, Vuenow Marketing Services Ltd या कंपनीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन ईडीने Vuenow Marketing Services Ltd या कंपनीची चौकशी सुरु केली होती. अखेर चौकशी पूर्ण झाल्यानंतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंचा शिलेदार वर्षभराने जेलबाहेर!

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.