नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्गाचे विरोधात सांगलीतल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्व्हे प्रक्रिया त्वरित थांबवावी, सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
सांगलीवाडी येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द कराण्यासाठी पत्रे लिहिले आहेत.
राज्य सरकारने हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत, आज शेतकरी आपल्या रक्ताने पत्र लिहितोय, मात्र यापुढील काळात राज्यकर्त्यांचा रक्त सांडल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आला आहे.
Ambernath: अंबरनाथच्या शिवगंगा नगरमध्ये २४ तासात ४ चोऱ्या, पाण्याचे मीटर, पाईपलाईन आणि नळ चोरलेशिवगंगा नगरमधील शिवदर्शन अपार्टमेंटमधील सर्व नळ आणि पाईप, शिवश्रद्धा इमारतीतील पाण्याचे ९ मीटर, शिव बिल्डिंगमधील पाण्याचे मीटर आणि पाण्याची पाईपलाईन, तसंच हरिदर्शन इमारतीतील ड्रॉवर या चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी रहिवाशांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे शिवगंगा नगरच्या समोरच पोलीस चौकी असूनही चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसून त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
Amol Mitkari: अमोल मिटकरींनी केलं रात्री उशिरा 'स्टिंग ऑपरेशन', स्टिंगमध्ये बेघर केंद्रात अनेक अनियमितताअकोल्यातल्या मातानगरात तत्कालिन पालकमंत्री बच्चू कडूंच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलंय.
या ठिकाणी भिकारी आणि घर नसलेल्या अनाथ नागरिकांची व्यवस्था करण्यात आलीय.
आमदार मिटकरींच्या या स्टिंगमध्ये या केंद्रातील अनेक अनियमितता समोर आल्यायेत.
अकोला महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या केंद्रासाठी तेंव्हा 4.50 कोटींचा निधी शासनाकडून देण्यात आला होताय.
मात्र, आमदार मिटकरींनी अकोल्यातील याच 'संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील अव्यवस्था एका 'स्टिंग ऑपरेशन'मधून समोर आणलीय.
विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ नगरसेवकाविरुद्ध कारवाईचा ठरावविरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवका विरुद्ध कारवाईचा ठराव करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात देहू नगरपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी प्रचार केला होता.
देहू नगरपंचायतीच्या नगरसेवकांवर विरोधी पक्षाचे उमेदवार बापू भेगडे यांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत बजावलेल्या सूचना पत्रानुसार गटाच्या बैठकीत कारवाईचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
तर या बैठकीत नगरसेवक प्रवीण काळोखे, सपना मोरे आणि मीना कुऱ्हाडे या तीन नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष वरिष्ठांकडे ठराव पाठवण्यात येणार असल्याची माहिती गटनेते योगेश परंडवाल यांनी दिली.
Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात रात्री अकरा वाजता दुकानांना भीषण आगया आगीत कुदळवाडी परिसरातील तीन दुकान पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
जळालेल्या दुकानांमध्ये एक फुटवेअर शॉप आणि दोन रेडिमेट कपड्यांचे शॉपचं समावेश आहे.
आग लागल्याची वर्दी मिळताच, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे.
या आगित जीवित हानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमध्ये दुकानाला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.
Raigad Politics: रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायमरायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याने जिल्हा नियोजन समिती गठीत झालेली नाही.
त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही.
नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलं.
मात्र याचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय.
स्वतंत्र बैठक घेवून जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जाईल. रायगड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात शासन योग्य निर्णय करेल असही त्यांनी सांगितलंय.
पालकमंत्री पदाचा कुठलाही तिढा नाही. काही निर्णय घ्यायला वेळ लागतो अशी सारवासारव राहुल नार्वेकर यांनी केलीय.