जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे भाषण आणि त्यांची सडेतोड उत्तरे तुम्ही ऐकली असतील. पण त्यांची लव्ह स्टोरी तुम्हाला माहीत आहे का?
एस. जयशंकर आणि क्योको यांची भेट 90 च्या दशकात झाली. त्या काळात जयशंकर टोकियो येथील भारतीय दूतावासात मिशन उपप्रमुख म्हणून तैनात होते.
जयशंकर यांचे पत्नी क्योको जयशंकर मूळच्या जपानच्या आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी क्योको अनेक कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम करतात.
क्योको सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसतात. मागच्या वर्षी झालेल्या जी-२०शिखर परिषदेला उपस्थित राहिल्या होत्या.
एस. जयशंकर आणि त्यांची पत्नी क्योको या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 9 जानेवारी रोजी असतो.
एस. जयशंकर यांना हिंदी, इंग्रजी, तमीळ, रशियन, हंगेरीयनसहीत एकूण अर्धा डझनहून अधिक भाषा बोलतात. क्योको सुद्धा अगदी छान हिंदी बोलतात.