हिंदू धर्मामध्ये कुंभ संक्रांतीला मोठे महत्त्व आहे. या दिवशी सूर्य कुंभ राशीत गोचर करणार आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. जाणून घ्या यंदा कुंभ संक्रांत कधी आहे आणि त्या दिवशी नेमके काय करायचे असते.
कुंभ संक्रांतीच्या दिवशी पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्यांमध्ये स्नान करणे पुण्याचे मानले जाते. तसेच या दिवशी व्रत केल्यास शनीच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची दाहकता कमी होऊ शकते.
यंदा १२ फेब्रुवारी रोजी कुंभ संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य कधी द्यायचे व पूजा कशी करायची, याची माहिती आवर्जून वाचा.
कुंभ संक्रांतीविषयी वाचाहिंदू पंचांगानुसार, माघ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी कुंभ संक्रांत असेल. या दिवशी दुपारी १२:३५ पासून सायंकाळी ६:०९ या कालावधीपर्यंत शुभ कालावधी असेल. महापुण्य काल दुपारी ४:१८ ते सायंकाळी ६:०९ एवढा असेल. या कालावधीत गंगा स्नान, दान-पुण्य वा अन्य धार्मिक कार्ये करता येऊ शकतील.
सूर्याला अर्घ्य कसे द्यायचे?सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करावे. शुभ मुहूर्त पाहून अर्घ्य द्यावे. यासाठी दूध, पाणी, तीळ, गूळ याचा वापर करता येईल. सूर्याला नमस्कार करून मंत्रोच्चारांमध्ये हे कार्य करावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.