Uric Acid : युरीक ऍसिड नियंत्रणात राहण्यासाठी बेस्ट मुद्रा
Marathi February 09, 2025 04:24 AM

बदलती लाइफस्टाइल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे कमी वयातच अनेकजण विविध आजारांनी ग्रस्त होत आहेत. यापैंकी एक म्हणजे युरिक ऍसिडची समस्या. युरिक ऍसिड शरीरात ऍटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते आणि रक्तवाहिन्यांना संरक्षण देते. पण, जेव्हा शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढते तेव्हा किडनी स्टोन, सांधेदुखी, शरीरात सुज येणे अशा आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे शरीरात युरिक ऍसिड वाढल्याने डायबिटीस, थायरॉइड आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर समस्या सुरू होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी तुम्ही आरोग्याची काळजी घ्यायला हवी. यात तुम्हाला योग्य आहार, व्यायाम, योगाच्या मदतीने शरीरातील वाढलेली युरिक ऍसिडची पातळी नक्कीच कमी करता येईल.

युरिक ऍसिड हे एक केमिकल आहे, जे शरीरात प्युरीन नावाच्या घटकामुळे रक्तात तयार होते. प्युरिन शरीरात तयार होतात. पण, अन्नाद्वारे सुद्धा प्युरिन शरीरात प्रवेश करते. प्युरिन एक विषारी केमिकल आहे, जे शरीरात मुत्रपिंडाद्वारे फिल्टर केल्यानंतर शरीरातून काढून टाकली जातात. पण, याचे काही अवशेष शरीरात राहिल्यावर युरिक ऍसिडची पातळी वाढू लागते आणि मूत्रपिंड ते फिल्टर करु शकत नाही. अशाप्रकारे ते क्रिस्टलच्या स्वरूपात हाडांमध्ये जमा होते.

युरिक ऍसिडसाठी मुद्रा –

अपन मुद्रा –

अपान मुद्रेच्या सरावामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत होते. ही मुद्रा योग्यरित्या केल्यास शरीरातील ९० टक्के विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

करण्याची पद्धत –

  • अपान मुद्रा करण्यासाठी ताठ बसावे.
  • यानंतर तुमचे दोन्ही हात वरच्या दिशेला करा.
  • नंतर मधले बोट, अनामिका बोट एकत्र जोडा आणि अंगठ्याने स्पर्श करा.
  • उर्वरित दोन्ही बोटे सरळ ठेवा.
  • हळूहळू श्वास घ्या आणि श्वासावर लक्ष केद्रींत करा.

Pran मुद्रा –

प्राण मुद्रेच्या सरावाने युरिक ऍसिडची पातळी कमी होते.

करण्याची पद्धत –

  • प्राण मुद्रा करण्यासाठी पाळ सरळ ठेवून बसावे.
  • नंतर दोन्ही हात पुढे करा.
  • दोन्ही हातांच्या करंगळी आणि अनामिका वाकवा, नंतर अंगठ्याच्या टोकाशी जोडा.
  • उर्वरित बोटे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला V हे अक्षर तयार झालेले दिसेल.
  • कमीत कमी 10 मिनिटे ही मुद्र करा आणि दरम्यान श्वास घ्या.

हेही वाचा :

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.