Nashik Crime : नात्यातील मुलीवर जडले प्रेम; एकटीला गाठत केले भयानक कृत्य, मुलीची प्रकृती चिंताजनक
Saam TV February 10, 2025 10:45 PM

तबरेज शेख 
नाशिक
: नात्यात असलेल्या मुलीवर तरुणाचे प्रेम जडले. या प्रेमात ठिणगी पडली आणि यातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नात्यातील असलेल्या तरुणाकडूनच हे कृत्य करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेत सदर तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

च्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे. भर दिवस घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान नात्यात असलेल्या तरुण- तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडले होते. त्यांच्या भेटीगाठी देखील होत होत्या. दरम्यान दोघांमध्ये काहीतरी बिनसले. यातून सदर तरुणाने नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर १९ वर्षीय तरुणीवर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

तरुणाला घेतले ताब्यात 

नात्यातीलच तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले असून प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली असून हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. यानंतर सदर घटनेप्रकरणी आता मुंबई नाका ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तरुणीची प्रकृती चिंताजनक 

तरुणीवर चाकूने वार करण्यात आल्याने तरुणी यात गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणीला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.