Weight Loss Health Tips: 5 मुलांची आई अन PCOS असूनही 9 महिन्यात केलं 31 किलो वजन कमी, जाणून घ्या काय आहे फंडा
esakal February 10, 2025 10:45 PM

Weightloss Tips By Fatloss And Health Coach Aimee Meier: एमी मेयर एक फॅटलॉस आणि हॉर्मोन हेल्थ कोच आहे. तिने 9 महिन्यात 31 किलो वजन कमी करत एक आश्चर्यजनक बदल घडवून आणला आहे. तिच्या या प्रवासाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिने पीसीओएस (PCOS) शी झुंज देताना आणि पाच मुलांना सांभाळताना हे यश मिळवले आहे.

ती नियमितपणे तिच्या सोशल मीडियावर वजन कमी करण्याच्या आणि हॉर्मोन संतुलनाच्या विषयी माहिती देत असते. नुकतीच तिने तिच्या या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने वजन कमी करण्यासाठी कोणत्या ३ महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या ते सांगितले आहे. काय आहेत या महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

जेवणानंतर हालचाल

एमी जेवण झाल्यांनतर हालचाल करायला सांगते. जेवणानंतर अर्ध्या तास हलकीशी शारीरिक हालचाल करणे किंवा 10 मिनिटे चालणे किंवा फायदेशीर ठरते असे ती सांगते. एमी सांगते, " मी जेवण झाल्यावर लगेच 30 मिनिटांचा टाईमर लावते. चालायला जाता आलं नाही तर मी घरातील लहानसहान कामं करते. बाहेर असले तर मी बाथरूममध्ये जाऊन 10 बॉडी स्क्वॅट्स करते." हे करण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि चयापचय वाढण्यास मदत होते. त्यामुळे संशोधन देखील याला पाठिंबा देते असे ती म्हणाली.

100-50 पद्धत

एमी तिच्या आहारात 100-50 पद्धत अवलंबते, ज्यामध्ये ती दररोज 100 ग्रॅम प्रोटीन आणि 50 ग्रॅम आरोग्यदायी फॅट्सचे सेवन करते. हा संतुलित आहार स्नायूंचे संरक्षण करतो, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतो आणि दिवसभर ताजेतवाने व तृप्त ठेवतो.

कोर्टिसोल संतुलन

वजन कमी करण्यात हार्मोन्सची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे एमी कोर्टिसोलच्या पातळीला संतुलित ठेवण्यावर भर देते. तणावामुळे वाढणारे कोर्टिसोलचे प्रमाण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकते.

तसेच एमी तणाव नियंत्रणासाठी माइंडफुलनेस, पुरेशी झोप आणि रीलॅक्सिंग टेक्निकचा वापर करते. यामुळे तिच्या शरीरात आरोग्यदायी हार्मोनल संतुलन निर्माण झाले, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरले.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.