दिल्ली इथं काँग्रसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी महाराष्ट्रातील काही आमदार उपस्थित होते. याचबरोबर या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.
Raigad Politics : रायगडर नियोजन समितीच्या बैठकीची कल्पना नव्हती; एकनाथ शिंदेंच्या आमदारांची भूमिकाउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. परंतु या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अनुपस्थित होते. आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावलेंनी फिरवली पाठ
Mahayuti Politics : अजितदादांच्या घेतली रायगड नियोजनची समितीची बैठक; एकनाथ शिंदेंचे आमदार अनुपस्थितउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित रायगड जिल्हा नियोजनाची बैठक आज झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे शिवसेनेचे एकही आमदार उपस्थित नव्हते. पालकमंत्रीपदाच्या वादावरून तिढा कायम असल्याचे यातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
BEED Crime : परळीतील मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे घेणार पोलिस अधीक्षकांची भेटबीडच्या परळीतील मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार आहेत. पोलीस उपअधीक्षकांकडे तपास देऊन अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ज्ञानेश्वरी मुंडे पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
Eknath Shinde : मुंबई शहर, ठाणे जिल्हा नियोजनासंदर्भात बैठक; एकनाथ शिंदे हजर राहणारशिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आजच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. काल ते बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे ही बैठक आज होत आहे.
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाच्याविरोधात महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना रक्तानं लिहिलं पत्रनागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीमधील बाधित गावातील शेतकऱ्यांनी रक्तांना पत्र लिहण्याची मोहीम सुरू केली आहे. सांगलीवाडी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्तांनी पत्र लिहिल्यानंतर, आता बुधगाव इथल्या महिला शेतकऱ्यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्तांनी पत्र लिहिलं आहे.
Vaibhav Naik live: 20 वर्ष मागील संपत्तीची माहिती सादर करालाचलुचपत विभागाकडून माजी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. वैभव नाईक व त्यांची पत्नी स्नेहा नाईक हे दोघेही चौकशीसाठी आता रत्नागिरीकडे निघाले आहेत. रत्नागिरीच्या Acb कार्यालयात ते पोहोचतील. 20 वर्ष मागील संपत्तीची माहिती सादर करण्यास Acbने त्यांना सांगितले आहे.
Soybean Procurement Date Not Extended: सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून नव्याने मुदतवाढ नाहीमहाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र सरकारने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती. काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणा मध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकाने ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
Santosh Deshmukh murder Case :मनावर दगड ठेवून संतोष देशमुखांची लेक आज बारावीच्या परीक्षेला जाणारमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाले आहेत. या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी सर्वत्र होत असतानाच देशमुख यांची कन्या वैभवी हीची आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. मनावर दगड ठेवून ही लेक आज बारावीच्या परीक्षेला जाणार आहे.
Mamta Kulkarni Mahamandaleshwar Controversy: ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामाकाही दिवसापूर्वी यमाई ममता नंद गिरी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. ममताने महामंडलेश्वरपदाची दीक्षा घेतल्यापासूनच ममता वादात अडकली होती. याच वादामुळे तिनं राजीनामा दिल्याचे समजते.