Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची जीभ छाटणाऱ्याला ५ लाख; वादग्रस्त विधानावरून एन्फ्ल्यूएन्सरचीच वादग्रस्त घोषणा
Saam TV February 12, 2025 04:45 AM

Ranveer Allahbadia Controversial Statements : स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो वादात अडकला आहे. या शोच्या शेवटच्या भागामध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने हजेरी लावली होती. दरम्यान त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणावरुन रणवीरसह समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट शोचे निर्माते बलराज घई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

रणवीर अलाहाबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' शोच्या एका भागामध्ये मध्ये आई-वडिलांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्य केले. यावरुन रणवीरच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे. रणवीरने वक्तव्यावर माफी मागत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

फैजान अन्सारी या एन्फ्ल्यूएन्सरने या प्रकरणावर अधिक वादग्रस्त विधान केले आहे. फैजानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने ' रणवीर अलाहाबादियाने इतके घृणास्पद वक्तव्य केले आहे की, मी जर तिथे असतो तर त्याची जीभ कापली असती. जर संपूर्ण देशातल्या कोणत्याही व्यक्तीने जीभ छाटून मला आणून दिली. तर मी त्या व्यक्तीला ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देईन', असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

रणवीरच्या विधानावर विविध स्तरांवरुन नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाचा दखल घेतली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने समय रैना, शोचे निर्माते बलराज घई आणि अन्य ३० ते ४० जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडपासून ते सहाव्या एपिसोडपर्यंतचे सर्व होस्ट आणि पाहुण्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.