'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट जवळपास तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.
'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत.
'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाने आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 5 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
'छावा' चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करणार असल्याचे दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'छावा' चित्रपट चित्रपट हिंदीत एकूण 4 व्हर्जनमध्ये रिलीज होत असून त्याला 2D व्हर्जनमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.