Pimpri Chinchwad Corporation : पाच हजार अनधिकृत बांधकामावर बुलडोजर; पिंपरी चिंचवड महापालिकेची कुदळवाडी परिसरात कारवाई
Saam TV February 12, 2025 07:45 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास पाच हजार अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर मशीन लावून पत्राशीठ बांधकाम निष्कासणाची कारवाई करत आहे. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोजर लावून तसेच मोठा फौज फाटा लावून महापालिका कुदळवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवत कारवाई करत आहे.

महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहे. यात प्रामुख्याने कुदळवाडी परिसरात अनेक वर्षांपासून दुकान थाटलेल्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. जवळपास २५० एकरवरील १५०० पेक्षा जास्त व्यावसायिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड महापालिकेने जेसीबी आणि बुलडोजर मशीन लावून जमीनदोस्त केली आहेत. हि कारवाई अजून सुरूच राहणार आहे. 

कायद्याचा धाक दाखवून व्यवसाय संपुष्टात 

पिंपरी चिंचवड शहराला ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल हब अशी ओळख आहे. या इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात स्क्रॅप निघत असतो. इंडस्ट्रीमधून निघणारा स्क्रॅप खरेदी करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी सर्वात जास्त दुकाने ही कुदळवाडी परिसरात आहेत. मात्र महापालिका पिढ्यान पिढ्यापासून व्यापाऱ्यांना कायद्याचे धाक दाखवून त्यांचा व्यवसाय संपुष्टात आणत आहे. हे सर्व होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही राजकीय पुढार्याची या व्यावसायिकांना साधी साध देखिल मिळत नाही यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे आरोप 

आमचा योग्य पुनर्वसन न करता महापालिका आमच्यावर तर सूडबुद्धीने कारवाई करत आहे. असा आरोप कुदळवाडी परिसरातील व्यापारी, व्यावसायिक करत आहेत. आम्हाला स्क्रॅप मॅनेजमेंट यार्ड उपलब करुन न देता आमच्यावर पिंपरी चिंचवड महापालिका सूड बुद्धीने कारवाई करत आहे; असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.