बदलापूरमध्ये मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूनक 25 मिनिटांपासून विस्कळीत झाली आहे. याचा लोकल ट्रेनवर परिणाम झाला आहे.
Delhi Live : खासदार संजय दिना पाटील आदित्य ठाकरे यांची घेणार भेटआदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे देखील उपस्थित होते.
Delhi Live : आदित्य ठाकरे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणारआदित्य ठाकरे आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची आज भेट घेणार आहे. ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल सारखाच लागला आहे.
Aaditya Thackeray Live Updates: जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडा - आदित्य ठाकरेआज दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितलं की, शिंदे सेनेला जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडावं. जे महाराष्ट्र लुटतात त्यांच कधीही कौतुक करणार नाही.
Rahul Gandhi Live Updates: राहुल गांधी काँग्रेस खासदारांच्या भेटीसाठी संसदेत पोहोचलेलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस खासदारांच्या भेटीसाठी संसदेत पोहोचले.
Aaditya Thackeray Live Updates: आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; राहुल गांधींची भेट घेणारआदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार
PM Modi Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं दाखल होताच ब्लेअर हाऊसबाहेर पंतप्रधानांचं भारतीय समुदायानं जोरदार आणि उत्साहात स्वागत.
मुंबई : कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील पात्र मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निश्चित करणाऱ्या माजी मुख्य न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला तब्बल दीड महिन्यानंतर मुदतवाढ देण्यात आली आहे. या समितीची मुदत ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपली होती. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी शासन निर्णय जारी करत समितीला ३० जून २०२५ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. शिंदे समितीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतरही या समितीला पुन्हा मुदतवाढ दिल्याने यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dhananjay Munde LIVE : धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या, परळी कोर्टाने बजावली नोटीसधनंजय मुंडे यांना परळी कोर्टाने निवडणुकीत खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहे.
President Draupadi Murmu LIVE : 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या मेळाव्याला राष्ट्रपती मुर्मू बंगळूरला येणारबंगळूर : आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर येथे १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय महिला परिषद आयोजित केली असून, यात ६० हून अधिक वक्ते आणि पाचशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दहाव्या महिला परिषदेला राजकारण उद्योग कला आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या अनेक महिलांबरोबरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्षपद श्री श्री रविशंकर यांच्या भगिनी भानुमती नरसिंहन भूषविणार आहेत. १८० देशात कार्यरत असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेत त्या स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना व बालसंगोपन कार्यक्रम राबवतात.
Rajan Salvi LIVE : माजी आमदार राजन साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारमुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. साळवी यांनी बुधवारी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. ते आज (ता.१३) ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Mahakumbh Mela LIVE : महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार, हुबळी ते वाराणसी सहा फेऱ्या होणारप्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी हुबळी ते वाराणसी दरम्यान सहा फेऱ्या होणार असून ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली, अहिल्यानगर येथून धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे.
Nirmala Sitharaman LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज प्राप्तिकर विधेयक लोकसभेत सादर करण्याची शक्यताLatest Marathi Live Updates 13 February 2025 : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. साळवी यांनी बुधवारी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. ते आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच शीख दंगल प्रकरणातील आरोपी आणि काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांना राउज अव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले. आता हेच न्यायालय कुमार यांना येत्या १८ तारखेला शिक्षा सुनावणार आहे. तर, कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील पात्र मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निश्चित करणाऱ्या माजी मुख्य न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला तब्बल दीड महिन्यानंतर मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषित केलेले नवे अधिक स्पष्ट आणि सोपे असे प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर अकोला जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका आहे तर, काही भागांत थंडी कमी झालेली दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..