Maharashtra Political News Live : दिल्लीत डिनर डिप्लोमसी, उद्धव सेनेत पुन्हा भूकंप?
Sarkarnama February 13, 2025 05:45 PM
Operation Tiger in Delhi : दिल्लीतील डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाकडून उद्धव सेना पुन्हा निशाण्यावर

'ऑपरेशन टायगर' ने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असून पुन्हा एका भूकंपाची चाहुल लागली आहे. राज्यात 'ऑपरेशन टायगर'मधून माजी आमदारांचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटात केला जात असतानाच खासदार श्रीकांत शिंदेंच्या डिनर डिप्लोमसीतून ठाकरे गटाचे खासदार गळाला लागले आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी उपस्थिती लावली. यामध्ये खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Aaditya Thackeray Live Updates: जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडा : आदित्य ठाकरे

राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 'ऑपरेशन टायगर' सुरू केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते फोडले जात आहेत. यावरून आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी शिंदे सेनेला इशारा दिला जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडावं. जे महाराष्ट्र लुटतात त्यांच कधीही कौतुक करणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.

Suresh Dhas News : अजित पवारांनी टाळली सुरेश धसांची भेट

बीड जिल्हा नियोजन समितीच्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारीसाठी भाजप आमदार सुरेश धस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट मुंबईत घेणार होते. मात्र त्यांनी भेट टाळल्याचे समोर येत आहे.

Aditya Thackeray Latest Updates : कोणी कोणाच कौतुक करावं हा त्यांचा विषय : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून ते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत आहेत. मात्र त्यांची भेट घेणं आदित्य ठाकरे यांनी टाळले आहे. तसेच शरद पवार यांना आज भेटणार नसून त्यांच्याशी काहीही बोलण झालं नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी, कोणी कोणाच कौतुक करावं हा त्यांचा विषय आहे. याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. पक्ष फोडण्याच पापा एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Aditya Thackeray Latest Updates : राहुल गांधी यांची भेट घेतली, आता केजरीवाल यांची भेट घेणार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मात्र दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असून आता ते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. याआधी त्यांनी, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगताना निवडणूक आयोगाचा दिल्ली आणि महाराष्ट्र निवडणुकीत मोठा हात असल्याचा दावा केला आहे

Aditya Thackeray Latest Updates : राज्यात 'ऑपरेशन टायगर' सुरू अन् आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

राज्यात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 'ऑपरेशन टायगर' सुरू केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असतानाच आदित्य ठाकरे मात्र दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे राज्यात अनेक तर्क काढले जात आहेत. ते दिल्लीत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे

Parliament Budget Session Live Updates : संसदेत नवीन आयकर आणि वक्फ विधेयक सादर होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संसदेत नवीन आयकर विधेयक आणि वक्फ विधेयक सादर होणार आहे. यादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार या विधेयकाला आधीच विरोध करत असून दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.

PM Modi USA Visit News : पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचले, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचले असून त्यांचे तेथे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्याशी भेटी घेतील. याआधी ते फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते.

Shinde Committee LIVE : न्या. शिंदे समितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील पात्र मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निश्चित करण्यासाठी शिंदे समिती करण्यात आली आहे. या समितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते दिल्लीत आपल्या खासदारांशी संवाद साधणार आहेत. तसंच शरद पवारांवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर ते आज शरद पवार यांची भेट घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Akola News : मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

अकोल्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसटीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अकोला येथील पातूर तालुक्यातील तूलांगा खुर्द गावात ही तोडफोड केल्याची माहिती आहे. मनसेचे शाखा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याच्या निषेधार्थ ही तोडफोड करण्यात आली आहे.

Bhakar Karekar passed away : प्रख्यात शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं दीर्घ आजारानं बुधवारी रात्री निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते. त्यांचं पार्थिव दादर येथील त्यांच्या घरी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Rajan Salvi Join Shivsena : राजन साळवी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार

ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आज गुरूवारी (ता.13) ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यात मोठं शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.