'छावा' (chhaava) चित्रपट आता काही तासांत रिलीज होणार आहे. चाहेत चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले आहे. चित्रपटाचे तगडे प्रमोशन करण्यात आले आहे. 'छावा' चित्रपट उद्या (14 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून संभाजी महाराजांची यशोगाथा दाखवण्यात आली आहे. नुकताच 'छावा'चा म्युझिक लाँच सोहळा पार पडला.
'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्याला खूप मोठे कलाकार पाहायला मिळाले. यात गायक आणि संगीतकार ए.आर. (A. R. Rahman) यांनी देखील हजेरी लावली. तसेच आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 'छावा' चित्रपटाची गाणी खूप गाजत आहे. चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'छावा' चित्रपटात 'जाने तू', 'आया रे तुफान' ही गाणी आहेत.
ए. आर. रहमान आणि मराठी गायिका सामंतने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. ए. आर. रहमान आणि वैशाली सामंतने (Vaishali Samant ) 'छावा' चित्रपटातील 'आया रे तुफान' हे गाणे गायले आहे. यांच्या गाण्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. गायिका वैशाली सामंतने देखील याचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. याला तिने हटके कॅप्शन दिलं आहे. वैशालीने लिहिलं की, "माझ्यासाठी खूप खास दिवस... ''च्या म्युझिक लाँच सोहळ्याला ए. आर. रहमान सरांसोबत परफॉर्मन्स...माझं एक स्वप्न पूर्ण झालं..."
12 फेब्रुवारीला 'छावा' चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला आहे. 'छावा' चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये झाला. 'छावा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच तगडी कमाई केली आहे. 'छावा' पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई करणार असल्याचे दिसून येत आहे.