ती परत येतेय! 'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट; अहिल्यादेवींना टक्कर द्यायला येतेय मालिकेची जुनी खलनायिका
esakal February 13, 2025 08:45 PM

छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीच्या. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. काही मालिका तर प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडतात. त्यातील एक लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील पारू. सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यात ट्विस्ट आला नाही तर ती मालिका कसली? आता 'पारू' मालिकेतही नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अहिल्यादेवींना टक्कर देण्यासाठी जुन्या खलनायिकेची एंट्री होणार आहे.

ती परत आली

मालिकेत सध्या आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाची तयारी सुरू आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित होते. मात्र त्यात अशी एक व्यक्ती हजर होती जिची कुणीही कल्पना केली नव्हती. ती होती दिशा. दिशा ही अनुष्काची लहान बहीण आहे. तिला पोलिसांनी अटक केली होती. बरेच काळ ती तुरुंगात होती. मात्र आता ती परत आली आहे. अचानक ती आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्यात आली होती. इतकंच नाही तर तिने आपल्या बहिणीला धमकीदेखील दिलेली.

आता होणार दिशांची एंट्री

आता दिशाची पुन्हा धमाकेदार एंट्री होणार आहे. अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ती 5 आलिशान गाड्या, 11 बॉडीगार्ड्स आणि बॉसी लूक करून मालिकेत परतताना दिसत आहे. दिशा आणि अनुष्का मिळून किर्लोस्कर उद्योगसमूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करतायत. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे मालिकेची खरी व्हिलन मालिकेत परत आल्याचं बोललं जातंय. आता पुन्हा एकदा अहिल्यादेवी आणि दिशा यांच्यातील नोक-झोक पाहायला मिळणार आहे. दिशा आता थेट अहिल्यादेवींनाच चॅलेंज करताना पाहायला मिळणार आहे.

दुसरीकडे अनुष्का, पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते, पारूविरुद्ध काहीतरी सबळ पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करते. पारू मात्र अनुष्काला तिच्याच पद्धतीने उत्तर देते. याशिवाय ‘पारू’ आता पुन्हा एकदा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबेसेडर सुद्धा होणार आहे. त्यामुळे आता नेमकं मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.