Sebi Demand Notice: शेअर बाजार नियामक सेबीने गेल्या वर्षी 7 जणांवर सुमारे 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता आणि आता तो न भरल्याबद्दल डिमांड नोटीस पाठवली आहे. SEBI ने एका टीव्ही चॅनलवर शेअर बाजाराशी संबंधित कार्यक्रम सादर करणाऱ्या प्रदीप बैजनाथ पंड्या आणि इतर सात जणांना फसवणुकी संदर्भात गेल्या वर्षी जूनमध्ये आकारण्यात आलेला दंड न भरल्याबद्दल 2.83 कोटी रुपयांची डिमांड नोटीस पाठवली आहे.
पंड्याशिवाय तोशी ट्रेड, महान इन्व्हेस्टमेंट, मनीष वासनजी फुरिया (एचयूएफ), अल्पा अल्पेश फुरिया, अल्पेश वासनजी फुरिया (एचयूएफ) यांनाही दंड भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) गेल्या वर्षी जूनमध्ये लावलेला दंड न भरल्यामुळे यांना डिमांड नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
दंड भरण्साठी 15 दिवसांची मुदतसेबीने इशारा दिला आहे की जर पंड्या आणि इतर संस्थांनी 7 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या नोटीसनंतर 15 दिवसांच्या आत पेमेंट केले नाही तर, त्यांच्या बँक खात्यांसह त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. सात वेगवेगळ्या डिमांड नोटिसमध्ये, SEBI ने या संस्थांना 15 दिवसांच्या आत व्याज आणि वसुलीच्या खर्चासह 2.83 कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत.
सेबीने गेल्या वर्षी जूनमध्ये पंड्या आणि इतर सात संस्थांना फसवणूक केल्याबद्दल सिक्युरिटी मार्केटमधून पाच वर्षांसाठी बंदी घातली होती आणि एकत्रितपणे 2.6 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सेबीने वारंवार नोटीस पाठवूनही पंड्या किंवा या सर्व संस्थांनी दंड भरलेला नाही.