प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला १३ जानेवारीला सुरुवात झाली. मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या दिवशी अमृत स्नान झाले.
तिसऱ्या अमृत स्नानानंतर नागा साधू परतीची यात्रा सुरू करतात. महाकुंभ मेळ्या संपण्यास अद्याप १५ दिवसांचा अवधी बाकी आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ मेळ्याचा समारोप होतो. याच दिवशा महाकुंभ मेळ्यातलं शेवटचं महास्नान होणार आहे.
महाकुंभ मेळ्यातून नागा साधू आणि संत परत जाण्यास वसंत पंचमीच्या अमृत स्नानापासून सुरुवात होते. सर्व नागा साधू त्यांच्या त्यांच्या आखाड्यातून परतीच्या यात्रेला लागले आहेत.
महाकुंभ मेळ्यातून परतण्याआधी नागा साधू संत कढी आणि भज्यांचे सेवन करतात. आखाड्यातून प्रस्थान करण्याआधी त्यांच्यासाठी विशेष कढी आणि भजी तयार करण्यात येतात.
कढी आणि भजी तयार करण्याचं काम स्थानिकांना दिलं जातं. हे खाण्यामागचे गुरु-शिष्य परंपरा असल्याचं मानलं जातं.
कुंभ मेळ्यात ही परंपरा प्रत्येक आखाड्यात बघायला मिळते. नाभिक समुदाय मोठ्या श्रद्धेनं भिक्षुंना भोजन देतात.
कुंभ मेळ्यातील आखाड्यात असणाऱ्या साधु-संतांच्या संख्येनुसार कढी आणि भजी तयार करण्यात येतात.Naga Sadhu Tradition In Maha kumbhEsakal
महाकुंभमधून नागा साधू त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात परत जाण्याआधी कढी आणि भजी खातात. त्यानंतरच ते प्रस्थान करतात. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आहे.