virat kohli unfollow ranveer allahbadia : रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये केलेल्या वक्तव्यपासून त्याला खूप ट्रॉलिंगचा सामना करावा लागत आहे. इन्फ्लुएंसरने एका स्पर्धकाला विचारला पालकांविषयाचा अपमानास्पद प्रश्न नेटिझन्सना आवडला नाही आणि अनेकांनी त्याला अनफॉलो करायला सुरुवात केली आहे. एका इन्फ्लुएंसर मार्केटिंग फर्मच्या अहवालानुसार, त्याने सुमारे ४०००० फॉलोअर्स गमावले आहेत.
दरम्यान, आता भारतीय क्रिकेटपटूनेही रणवीरला अनफॉलो केले आहे. विराटच्या फॉलोअर्स लिस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे आणि जेव्हा रणवीरला विराटच्या फॉलो लिस्टमध्ये शोधले तेव्हा नेटिझन्सना दिसले की या वादानंतर या विराटने त्याला अनफॉलो केले आहे. इन्स्टंट बॉलिवूड या मीडिया पोर्टलने हा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे नेटकाऱ्यानी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकाऱ्याने लिहिले, "या पिढीसाठी काय चांगले आहे हे त्यांना माहित आहे." दुसऱ्याने म्हटले, " या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी विराटची पीआर टीम प्रयत्न करत आहे. अनेकांनी विराटचे कौतुकही केले. एका व्यक्तीने म्हटले, "चांगले काम केले विराट, मी तुझ्यासोबत आहे आणि लोकांनी तुझ्याकडून शिकले पाहिजे " एका चाहत्याने लिहिले, "किंग कोहलीचा आदर करा
, समय, अपूर्व मखीजा, आशिष चचलानी आणि 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे एक-दोन दिवसांत पोलिसांसमोर हजर राहून त्यांचे म्हणणे नोंदवण्याची अपेक्षा आहे. समय आणि रणवीर दोघांनीही माफी मागितली आहे आणि हा भाग आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. समयने असेही म्हटले आहे की तो पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य करेल.