IND vs PAK Match : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज भारत आणि पाकिस्तामध्ये महामुकाबला सुरू आहे, पाकिस्तान आपला पहिला सामना न्यूझिलंडसोबत हारला आहे, तर भारत आपला पहिला सामना बांगलादेशसोबत जिंकला आहे. त्यामुळे आज पाकिस्तानसाठी करा किंवा मराची स्थिती असणार आहे. या हायहोल्टेज सामन्याकडे जगाचं लक्ष लक्ष लागलं आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं पाकिस्तानला 242 धावांमध्ये रोखलं. मात्र याच दरम्यान एका पाकिस्तानी व्यक्तीनं मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या या फॅनने म्हटलं आहे की, जर पाकिस्ताननं आज भारताला हरवलं तर मी पाकिस्तानच्या संघाला तब्बल एक कोटी रूपयांचं बक्षीस देईल.
त्यामुळे आता सर्वांनाच या व्यक्तीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मोहम्मद कामरान खान टसोरी असं या बक्षीस जाहीर करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ते पाकिस्तानमधील सिंध प्रातांचे गव्हर्नर आहेत. सध्या मोहम्मद कामरान खान टसोरी यांचं वास्तव्य लंडनमध्ये आहे. लंडनमधून ते आजचा सामना पाहाण्यासाठी दुबईला आले आहेत. याचदरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे, जर पाकिस्तानने आज भारताला हरवलं तर आपण पाकिस्तानच्या संघाला एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊ अशी घोषणा त्यांनी केली आहे.
टसोरी यांनी म्हटलं आहे की जर पाकिस्तानच्या संघानं भारताला हरवलं तर मी त्यांना एक कोटी पाकिस्तानी रुपयांचं बक्षीस देईल. माझ्या सदिच्छा पाकिस्तानी टीमसोबत आहेत. मला पाकिस्तानच्या संघावर पूर्ण विश्वास आहे. जर आज पाकिस्तानचा संघ जिंकला तर मी त्यांना एक कोटी रुपयांचं बक्षीस देईल. संपूर्ण देश पाकिस्तान जिंकावा यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान त्यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देखील म्हटलं होतं की, आमचा संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत चांगला खेळ केला आहे. मात्र भारतीय संघाला हरवणं हे संघासाठी मोठं चॅलेंज असणार आहे, संपूर्ण देश पाकिस्तानच्या क्रिकेट संघासोबत आहे. मात्र या सामन्यात अद्याप तरी भारताचंच पारडं जड दिसत आहे.