भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याने पाकिस्तानविरुद्धचा सामन्यात एका विक्रमाची नोंद केली. रोहित शर्माने 2013 पासून सलामीवीर म्हणून खेळत आहेत. तेव्हापासून रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खास करू शकला नाही. 15 चेंडूत त्याने 133.33 च्या स्ट्राईक रेटने 20 धावा केल्या. यावेळी त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला. पण शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. पण त्याने पाकिस्तानविरुद्ध एक धाव घेताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मागे टाकले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खातं उघडताच सलामीवीर म्हणून 9000 धावांचा पल्ला गाठला आहे.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये 181 डावात 900 धावांचा पल्ला ओलांडला आहे. सर्वात वेगाने हा आकडा गाठण्याचा विक्रम त्याने नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने 197 डावात 9000 धावा पूर्ण केल्या होत्या. आता हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला आहे. सचिन तेंडुलकरसह सौरव गांगुली, ख्रिस गेल, एडम गिलख्रिस्ट आणि सनथ जयसूर्या या सलामीवीरांनाही मागे टाकलं आहे. रोहित शर्मान वनडे क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा जगातील सहावा फलंदाज आहे.
वनडे क्रिकेटमध्ये 9000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी सौरव गांगुलीने 231 डाव घेतले. ख्रिस गेलने 246 डाव, एडम गिलख्रिस्टने 256 डाव, तर सनथ जयसूर्याने 268 डावा घेतले. रोहित शर्माने या सर्वांना मागे टाकलं आहे. ओपनर म्हणून सचिन तेंडुलकरच्या नावावर 15310, सनथ जयसूर्याच्या नावावर 12740, ख्रिस गेलच्या नावावर 10179, एडम गिलख्रिस्ट नावावर 9200, सौरव गांगुलीच्या नावावर 9146 आणि आता रोहितच्या नावावर 9019 धावा झाल्या आहेत.खरं तर रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून फॉर्मच्या चिंतेत आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शतक ठोकत त्याने फॉर्म असल्याचं दाखवून दिलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळलेल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पण संघाला आक्रमक सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरला आहे.