47136
सावंतवाडीत ठाकरे गटाला खिंडार
पदाधिकाऱ्यांसह, शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः येथे आयोजित भाजपच्या संघटन पर्व बैठकीत पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अन्य पक्षांतील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने पालकमंत्री राणे यांनी सावंतवाडी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे.
इन्सुली, पागावाडी, निगुडा, शेर्ले पानोसेवाडी, शेटकरवाडी, दांडेली, दोडामार्ग, तळेखोल, पिकुळे, हेवाळे, येथील ग्रामपंचायत सदस्या एकता शेर्लेकर, आरोस दांडेली धनगरवाडी, मडुरा व अन्य गावातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटन पर्व कार्यक्रमात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. तुमचा पक्षात निश्चितच सन्मान केला जाईल, असा विश्वास यावेळी राणे यांनी प्रवेशकर्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.