गोऱ्हेंच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ते आक्रमक
महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला तयारी सुरु झालीय.श्री क्षेत्र भिमाशंकरला महाशिवरात्री निमित्ताने देशभरातुन मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात यासाठी भिमाशंकर देवस्थान कडुन मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात येत असुन महाशिवरात्री निमित्ताने महादेव नगरी सजविण्यासाठीची तयारी सुरु आहे
पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारतीय संघ जिंकाव यासाठी बजरंगबलीला साकडं.- भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय टीम जिंकावी, यासाठी नागपूरात खामला चौकात होम हवन पूजा करण्यात आलीय...
- बजरंगबलीच्या मंदिरात साकडं घालत, भारतीय टीमसाठी हवन आणि पुजा अर्चा करण्यात आलीय..
- ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी सामना आहे.
- त्याकरिता नागपूरच्या खामला चौकातील हनुमान मंदिरात हवन करून टीम इंडिया जिंकण्यासाठी बजरंगबलीला साकडे घालण्यात येत आहे..
- सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी खामला येथील हनुमान मंदिरात पूजा पाठ...
- विराट कोहली, रोहित शर्मा सह इतर भारतीय खेळाडूंचे फोटो घेवून क्रिकेट समर्थक बसले पूजेला बसले आहे..
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये माध्यमिक विभाग पवना विद्या मंदिर शाळा प्रथम तर जिल्हा परिषद शाळा धामणे प्रथम आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम सुंदर झाला आणि त्यात मावळ तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद व खाजगी शाळांनी सहभाग घेतला होता. दोन्ही गटात प्रथम क्रमांकाच् शाळेला तीन लाख रुपये बक्षीस मिळणार आहे तर दुसऱ्या नंबरला दोन लाख रुपये आणि तिसऱ्या नंबरच्या शाळेला एक लाख रुपये अशी बक्षिसे मिळणार आहे. यावर्षी स्पर्धेत टप्पा क्रमांक दोन साठी जिल्हा परिषद व आणि खाजगी शाळांनी मोठ्या प्रमाणावर तयारी करून शाळेची सहभाग घेतला होता. शासकीय गटातून तीन व खाजगी घटक दिनाच्या सहा शाळा निवडण्यात गेल्या आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेत शून्य निकाल लागला होता. त्यावेळी शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात चिखल फेक झाली होती. मात्र यावर्षी जिल्हा परिषद च्या तीन शाळांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळाल्यामुळे बावळट तालुक्यात पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यवतमाळात वीस लाखांचा मद्यसाठा जप्त,उत्पादन शुल्क विभागाची कारवाईगोवा राज्यातून कमी किमतीत विदेशी मद्य आणून त्याचे रिसायकलिंग करून विक्री करणाऱ्या रॅकेट चा पर्दाफाश यवतमाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला.यवतमाळच्या राळेगाव इथे हा सगळा प्रकार सुरू होता. एका बार मधून ही दारू विक्री केली जात होती. गोवा मधून विदेशी मद्य यवतमाळ मध्ये आणणे आणि त्या मद्याला महाराष्ट्र मधील ब्रँड असलेल्या बॉटल मध्ये भरून विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरू होता ही दारू वर्धा चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात विकल्या जात होती उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती मिळताच कारवाई करून 20 लाखाचा मद्य साठा जप्त करून 2 जणांना ताब्यात घेतले आहे.
उमरगा बस स्थानकातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद, बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोयकर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटीला अडवून काही समाज कंटकांनी एसटीच्या चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याची घटना घडली आहे. त्यामुळे कर्नाटकात एसटीच्या बसेस आता बंद राहणार आहेत.उमरगा स्थानकातून कलबुर्गी, बिदर या उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांना बसेस जातात त्यामुळे प्रवाशांची प्रचंड अशी अडचण निर्मा
माणगाव एमआयडीसीतील कंपनीत चोरीबंद कंपनीत चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना माणगाव मध्ये समोर आली आहे. माणगावच्या विळे भागाड MIDC तील ट्यूब क्राफ्ट कंपनी अनेक वर्षांपासून बंद आहे. कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सर्व्हर, डीव्हिआर सह कंपनीतील मशिनरी, लोखंडी सामान, तांबे, अल्युमिनियमच्या तारा, रोल असा 33 लाखांचा माल चोरट्यांनी पळवून नेला आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार नवे घरे: आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यशनगर शहरातील पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.ही वसाहत इंग्रजांनी आपले घोड्यांचे तबेले म्हणून बांधली होती त्याच वसाहतीत स्वतंत्र मिळाल्या नंतर पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना राहण्यासाठी घरे देण्यात आली होती आता या ठिकाणी नवीन इमारत आणि पोलीस निवासस्थानच्या नव्या बांधकामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आले असून 320 फ्लॅट बांधण्यासाठी 115 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने काढली आहे. आज सकाळी आमदार जगताप यांनी पोलीस वसाहतीतील या जागेची पाहणी करत आता लवकरच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नवे घर मिळणार असल्याची माहिती आ. जगताप यांनी दिली.
Maharashtra Live Update : अनधिकृत धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर तणावपूर्ण शांतता- अतिक्रमण काढत असताना तणावाची झाली होती परिस्थिती निर्माण
- पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले होते अतिक्रमण
- सात दिवस सकल हिंदू समाजाचे आंदोलन स्थगित
- पोलीस आयुक्तांनी दोन्ही बाजूची काढली समजूत
- नाशिक शहरात जमावबंदी लागू
- पोलिसांचा रात्रीपासून खडा पहारा
- सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त नागरिकांना जाण्या येण्यासाठी प्रवेश बंदी
Maharashtra Live Update : राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन ३ मार्च ते २६ मार्च पार पडणारराज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन ३ मार्च ते २६ मार्च पार पडणार
फडणवीस सरकारच अस असणार अर्थसंकल्प अधिवेशन
३ मार्च पासून सुरू होणार अर्थसंकल्प अधिवेशन
८ मार्च महिला दिनी महिलांच्या प्रश्नवर विशेष चर्चा
१० तारखेला उपमुख्यंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर
अजित पवार यांचे यावेळी १० वे बजेट सादर करणार
देशाच्या राज्यघेटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे २५, २६ तारखेला संविधाना वर दोन दिवस चर्चा केली जाणार
गाढवावर लादून आणल जात 200 फूट खोल दरीतून पाणीनंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या केलापानी गावात आजही रस्ते नाही परिणामी इथल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी कसरत करावी लागते..रस्ता नसल्याने या आदिवासी गावकऱ्यांत गाढवाची मदत घेत 200 मीटर खोल दरीत असलेल्या नदीतून पाणी आणण्याची वेळ आली असून गाढवासोबत गाढव बनून या आदिवासी बांधवांना दररोज 5 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे थंड हवेचे ठिकाण असल्याने तोरणमाळ नजीकच्या केलापाणी या गावाला रस्ता मंजुर असून तयार न झाल्याने या गावकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे.रस्ता नसल्याने या आदिवासी बांधवांना वर्षभर पाणी,आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा पुन्हा श्री गणेशामराठा समाजाच्या प्रमुख 42 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज कोल्हापुरात बैठक सुरू
कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकीला राज्यभरातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित
बैठकीत मराठा आरक्षण मुद्द्यावर व्यापक चर्चेसह आंदोलनाची पुढील दिशा देखील ठरणार
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांना भारतीय नौदलाची मानवंदनाहिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान देऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे रक्षण करणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगड किल्ल्यावर भारतीय नौदलाच्या वतीने देण्यात आली मानवंदना..
मानवंदना देऊन नौदलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील गडकोट तसेच ऐतिहासिक वारसा स्थळांच्या शिवछत्रपती मानवंदना मोहीमेची करण्यात आली सांगता..
भारतीय नौदलाच्या आयएनएस - तानाजी या स्टेशनचे पाच अधिकारी आणि २५ जवान या मोहिमेत सहभागी
नौदलाच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना देण्यासाठी मोहीम आयोजित करण्यात आली होती...
यावेळी परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते..
Maharashtra Live Update : आरटीओच्या नावाने एजंटाने घेतले ८ हजार600 रुपयांत होणाऱ्या कामांसाठी बीडच्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंटाने 10हजार रुपये मागितले. त्यातील 8 हजार रुपये घेताना एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बीड शहरातील बशीरगंज चौकात करण्यात आली. दरम्यान, पकडल्यानंतर एजंटाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.अब्दुल रहीम अब्दुल मजीद असे पकडलेल्या एजंटाचे नाव आहे.
आरटीओ'च्या नावाने एजंटाने घेतले ८ हजार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई600 रुपयांत होणाऱ्या कामांसाठी बीडच्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंटाने 10हजार रुपये मागितले.
त्यातील 8 हजार रुपये घेताना एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
ही कारवाई बीड शहरातील बशीरगंज चौकात करण्यात आली. दरम्यान, पकडल्यानंतर एजंटाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
अब्दुल रहीम अब्दुल मजीद असे पकडलेल्या एजंटाचे नाव आहे.
आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक रंजित पाटील यांच्या नावाने १० हजार रुपयांची लाच मागणी केली. त्यात ८ हजार रुपये घेण्याचे ठरले.
त्याप्रमणे एसीबीने ही लाच घेताना एजंटाला बशिरगंज चौकात रंगेहात पकडले.
Talegaon: तळेगाव नगर परिषदेकडून कचरा मुक्त शहर अभियानाचे आयोजनमाझी वसुंधरा, आणि स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद च्या वतीने कचरा मुक्त शहर करण्याचा विडा कर्मचाऱ्यांनी उचललेलं आहे.
तळेगाव दाभाडे मधील मंत्रा सिटी रस्त्यालगत असलेल्या नाल्याची स्वच्छता करण्यात आली.
त्यामुळे पावसाळी पाणी प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे.आणि नाल्यातून वाहणाऱ्या प्रवाहाची क्षमता वाढवण्यास मदत झाली आहे.
दरम्यान हा नाला स्वच्छ केल्यामुळे मच्छर डास यापासून मंत्र सिटी नागरिकांची सुटका झालेली आहे.
या स्वच्छता अभियान मध्ये नगरपरिषदेचे कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता..
Beed: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्तसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ आता कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून खरेदी बंद आहे.
परिणामी शेतकऱ्यांना खाजगी बाजारात आपला कापूस विकावा लागतोय.
बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआयच्या माध्यमातून जवळपास 62 हजार क्विंटल कापूस खरेदी झाली.
मात्र सीसीआयच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आठवडाभरापासून ही खरेदी बंद आहे.
आधीच नाफेड कडून सोयाबीनची खरेदी बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर देखील हे संकट उभा ठाकले आहे.
भारत 2017 च्या हरलेल्या सामन्याचा बदला घेईल क्रिकेट प्रेमींमध्ये आजच्या सामन्याचे उत्सुकताआयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या इंडिया पाकिस्तान आजच्या सामन्याची उत्सुकता सर्वच क्रिकेट प्रेमींमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक मध्ये देखील क्रिकेट प्रेमींमध्ये आजच्या सामन्याची उत्सुकता असून भारतच आजचा सामना जिंकेल असा आत्मविश्वास पाहायला मिळतोय.
तर अनेक क्रिकेट प्रेमींकडून आपापल्या आवडत्या खेळाडू कडून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.
Chandrashekhar Bawankule : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टीयवतमाळ च्या उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच धारेवर धरले.
राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागात होते, असे असले तरी एसडीओ, तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही, वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागवून घेतले नाही, असे प्रश्न विचारत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
वाळू तस्करीबाबत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महसूल खात्याचे नाव महाराष्ट्रभर खराब होत आहे, त्यामुळे तुमची वेतनवाढ रोखायची का असेही बावनकुळे यांनी सुनावले.
Pune: पुण्यात कर्नाटकमधील बसला फासले काळेकर्नाटक मध्ये मराठी ड्रायव्हर वरती झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आज पुणे स्वारगेट येथे काल रात्री स्वारगेटमध्ये शिवभक्तांच्या माध्यमातून निषेधार्थ आंदोलन करण्यात आले...
बसला काळे फासण्यात आले....
कर्नाटक मध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला कन्नड येत नाही म्हणून मारहाण करण्यात आली...
बसची तोडफोड करण्यात आली याचा निषेध म्हणून स्वारगेट मध्ये काल रात्री आंदोलन करण्यात आले...
Nanded: रोजगार मेळाव्यातून दीड हजार तरुणांना मिळाला रोजगार.नांदेड जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी,यासाठी आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते.नांदेडच्या अर्धापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात दीड हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे.या मेळाव्यासाठी चार हजार स्थानिक तरुणांनी नोंदणी केली होती.150 हुन अधिक कंपन्यां या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.चार हजार तरुणांपैकी दीड हजार तरुणांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे.रोजगार मिळालेल्या या तरुणांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
Nagpur - 62 दुचाकी चोरी करणाऱ्या पाच आरोपीना अटक- नागपूर जिल्हातील विविध भागतील आणि गर्दीच्या ठिकाणावरूण दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक तर चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या दोन अशा एकूण 5 आरोपीना गुन्हा शाखेच्या युनिट 5 ने अटक केली.
- या आरोपींकडून 62 पेक्षा दुचाकी अंदाजे किंमत 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- बस स्थानक,मेट्रो स्टेशन, बॅक, गर्दीच्य ठिकाणावरून गाड्या चोरी करत होते.
- दुचाकी चोरीतील 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले
- आकाश खोब्रागडे असं मुख्य आरोपीच नाव आहे. या दोन साथीदार आकाश परतेकी आणि क्रिश बारीक मदतीने चोरी करत होता...
- तिघे मिळून दुचाकी चोरी करून भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील गॅरेजचालवणाऱ्या आरोपी गोलू बिजांडे आणि दिपक बिजाडे याला विक्री करण्यासाठी देत होते.
- हे आरोपी ग्रामीण भागातील नागरीकान दुचाकी विकत असल्याचं तपासात समोर आले..
-
विषबाधेमुळे १५ शेळ्यांचा मृत्यू..रिसोड तालुक्यातील घटना...वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शेतशिवारात विषबाधेमुळे १५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. दुपारी काही शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या असता, हळदीच्या पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या औषध टाकीतील पाणी प्यायल्याने त्यांना विषबाधा झाली. टाकीमध्ये हळदीवर फवारणीसाठी औषध तयार करण्यात आले होते. आणि हे पाणी पिल्यामुळे १५ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेत काही शेळ्यांना देखील विषबाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेळीपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लसणाचे भाव साडे पाचशे वरून 120 रूपयांवरमागील काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात लसूणाचे भाव वधारल्याने लसूणाची ठसण वाढली होती. लसूण बाजारात साडेपाचशे रुपये किलो दराने विकल्या जात होती. मात्र सध्या स्थितीत लसणाचे भाव 120 रुपये किलो एवढे असल्याने लसणाची ठसण उतरलीये. लसूण साडेपाचशे रुपये किलो पर्यंत तडकला होता. त्यामुळे गृहिणींना त्याचा वापर करताना हात आखडता घ्यावा लागत होता. आता नवीन लसुन बाजारात आल्याने आवक वाढली त्यामुळे किरकोळ भावात लसूण 120 रुपये प्रति किलो विकला जात आहे.
Maharashtra Live Update : स्वारगेटहून कर्नाटकला जाणाऱ्या बसेस बंदकर्नाटकमध्ये महाराष्ट्रमधील एका एस टी बस चालकाला कन्नड बोलता नाही म्हणून मारहाण करून बसची तोडफोड करण्यात आली.त्याचा निषेध म्हणून काल परिवहन मंत्र्यांनी राज्यातून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या बस बंद
पुण्याच्या स्वारगेट डेपोतून कर्नाटक राज्यात ६ बस दिवसभरात ये जा करत असतात.यामधील २ बिदर २ गुलबर्ग १ विजापूर १ गाणगापूर अशा बस जात असतात.
Akola : अकोल्यातल्या ऐदलापूर शेतशिवारातील संत्रा गळतीचे भयावह दृश्यआता बातमी आहेय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी. अकोल्यातल्या अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत सापडलाय.. कारण, अकोट तालुक्यात संत्रा पिकावर देठसुकी नावाचा रोगामुळे संत्र्याला मोठी गळती लागलीय, अनेक शेतकऱ्यांना खर्च निघण कठीण झालाय.. काही शेतकऱ्यांचं एकरी 65 टक्के पीक धोक्यात आलेये. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे..
मागील हंगामात हेक्टरीमागे 15 लाखाच उत्पन्न झालं होत... मात्र, यंदा केवळ देठसुकी नावाच्या रोगामुळे हेक्टरी 61 हजार रुपयांच संत्र्याचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आलंय. प्रत्येकी झाडातून 65 टक्के उत्पन्न वाया जातंये. अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर शेतशिवारातील संत्रा गळतीचे हे भयावह दृश्य सध्या पाहायला येतेये.. केवळ पस्तीस टक्के उत्पन्न हाती येत असून त्याला भाव अपेक्षाप्रमाणे नसल्याच शेतकरी सांगतात..
गावकऱ्यांची नदी स्वच्छतेची मोहीम, अंबरनाथ तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्यपर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या वनशक्ती एनजीओच्या माध्यमातून चामटोली, कोपऱ्याची वाडी, चिंचवली या गावकऱ्यांनी एकत्र येऊन उल्हास नदीच्या उपनदी पात्रात आज स्वच्छता मोहीम राबवली. या स्वछता मोहिमेत भाजप आमदार किसन कथोरे देखील सहभागी झाले होते. संस्थेचे सदस्य आणि गावकऱ्यांनी सकाळपासून या नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढला आणि या नदीला कचरामुक्त करण्याचा प्रयत्न केला. आता या नदीमध्ये इथल्या स्थानिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपायोजना केल्या जाणार आहेत. हेच पाणी उल्हास नदीला येऊन मिळत असल्याने बदलापूर, अंबरनाथ कल्याणवासी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे आता या नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपण सगळ्यांनी हाती घेतली पाहिजे, असं आवाहन आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केलं.
Satara : भारताच्या देश लष्कर सेवेत कार्यरत असणारा T 55 रणगाडा साताऱ्यात दाखलसातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच साताऱ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात आज पहाटे 4-5 च्या सुमारास T55 CAFVD रशियन मेड असणारा 38 टन वजनाचा रणगाडा लावण्यात आला आहे.. खासदार उदयनराजे भोसले यांचे भारतीय सेना बद्दलचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे.. खासदार उदयनराजे भोसले यांनी 3 तास उभे राहून कामाची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना देत रणगाडा बसवण्याचे काम सुरू केले..
SSC EXam : यवतमाळमध्ये 'साम टिव्ही'चा मोठा 'इम्पॅक्ट', मराठीचा पेपर व्हायरल करणारा अखेर अटकेतमराठीचा पेपर व्हायरल करणारा अखेर अटकेत,रात्री उशीरा महागांव पोलिसांनी केलीय अटक
केंद्रसंचालक अटकेत,पदावरून हटवले,दुसऱ्या आरोपीला ही अटक
यवतमाळच्या महागांव तालुक्यातील कोठारी येथिल आदर्श महाविद्यालयात मराठीचा पेपर केंद्रसंचालकाने व्हायरल केला.तद्नंतर चौकाशी दरम्यान चोळामोळा केलेली प्रश्न प्रश्न पत्रिका आढळून आल्याने केंद्रासंचालकांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आणि सर्व काही बाहेर आले
केंद्रासंचालक श्याम तास्के आणि अमोल राठोड या दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास महागांव पोलीस करित आहेत..
amrawati : तिवसा तालुक्यात रेड्याची झुंज.. रेड्यांची झुंज पाहण्यासाठी हजारोची गर्दीअमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सारशी येथील शेतशिवारात दोन रेड्यांची झुंज लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.. यावेळी रेड्याची झुंज पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती, रेड्याची झुंज लावणे कायद्याने बंदी असली तरी बेकादेशीररित्या ही झुंज लावण्यात आली, काही मिनिट दोन्ही रेडे आपापसात भिडले नंतर त्यांची टक्कर होताच दोन्ही रेड्यांनी पळ काढला,
Raigad : श्रीवर्धन मध्ये दगड, मातीचे बिनबोभाट उत्खननश्रीवर्धन तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती उत्खनन सुरू आहे. विकास कामांसाठी होणाऱ्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. दुसरीकडे ओव्हर लोड आणि वेगवान वाहतुकीमुळे अपघाताची भीती आहे. बागमांडले ते दिघी पर्यंत डोंगर पोखरले जात आहेत. त्यातून वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवते आहे. हे सर्व बिनबोभाट सुरू असताना संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करताना दिसत नाही.
Washim : केवळ २९५ हेक्टरवर उन्हाळी पेरणी....वाशिम जिल्ह्यात सरासरी ५९८९.९५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात जलस्रोतांची पातळी तळाला गेल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळेच फेब्रुवारी महिना संपत येण्याच्या मार्गावर आला तरी केवळ २९५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. हे प्रमाण केवळ ४.९२ टक्के आहे. पेरणीसाठी कालावधी हाती असला तरी सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने यंदा क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
झालेल्या २९५ पेरणीत सर्वाधिक २४५ हेक्टर क्षेत्र केवळ उन्हाळी भुईमूग पिकाचेच आहे. कूपनलिका, विहिरींनी तळ गाठला आहे. तर प्रकल्पांतील साठाही झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे शेतकरी उन्हाळी पिकांची जोखीम पत्करण्यास धजावत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Ambegaon- रस्त्यावर उभ्या कारला लागली आगआंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथे माळरानावरील रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत कार जळुन खाक झाली मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसुन कार मालकाच्या तक्रारीनंतर मंचर पोलिसांनी आकस्मित जळीत म्हणून या घटनेची नोंद केली आहे.
Agro News : टोमँटोच्या बाजारभावात कमालीची घट झाल्याने शेतकरी हतबल झालायउत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरुर तालुक्यात बाराही महिने टोमँटोचे उत्पादन घेतलं जातं हा टोमँटो उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो टोमँटोनर मोठा भांडवली खर्च करुन उत्पादित केला जातो मात्र आता उत्पादन खर्चाच्या तुलनेत टोमँटोला मिळणारा बाजारभाव ४० टक्क्यांनी तोट्यात असल्याने शेतकरी हतबल झालाय दोन महिन्यापुर्वी टोमँटोला 500 ते 600 रुपयांचा बाजारभाव आता आगदी 150 ते 200 रुपयांपर्यंत खाली कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीचा व वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
Nashik : - महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी- महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी २ दिवस खुलं राहणार
- महाशिवरात्रीला बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार
- दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना पूर्व दरवाजातील दर्शन बारीतून देण्यात येणार प्रवेश
- या काळात व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील बंद ठेवण्याचा निर्णय
- तर २६ तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन ( पेड दर्शन ) देखील राहणार बंद
- महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टचा निर्णय
HSC Exam : गणिताच्या पेपरला ६६ कॉपी बहाद्दरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गणित आणि संख्याशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये राज्यात ६६ कॉपी बहाद्दर सापडले आहेत.
Pune : बाजार समित्यांची उद्या राज्यस्तरीय परिषदमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभापती उपसभापती आदींसोबत बाजार समितीचे कामकाज आणि त्या सुधारणा करण्यासाठी उद्या बाणेर येथील बंटारा भवन येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला प्रधानमंत्री जयकुमार रावल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सहकार पणन विभागाचे सचिव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,उपसभापती, संचालक,सचिव उपस्थित राहणार आहेत
मंडळाने पणन विकासासाठी आतापर्यंत केलेल्या कामकाज राज्यातील बाजार समितीचे कामकाजात करावयाच्या कालानुरूप बदल शेतमालाच्या विपनानामध्ये आधुनिक बाबी,शेतकरी आणि इतर सर्व बाजार घटकांना द्यायच्या सोयी सुविधा याबाबत चर्चा होणार.