India vs Pakistan Live Score, ICC Champions Trophy 2025: ३० षटकांअंती पाकिस्तानने उभारल्या २ बाद १२९ धावा
esakal February 24, 2025 01:45 AM
IND vs PAK Live Score: ३० षटकांअंती पाकिस्तानने उभारल्या २ बाद १२९ धावा

मोहम्मद रिझवान व साऊद शकील यांच्या ११९ चेंडूत ७९ धावांची नाबाद भागिदारीच्या मदतीने पाकिस्तानने ३० षटकांत १२९ धावा उभारल्या आहेत.

IND vs PAK Live Score: २५ षटकांअंती देखील पाकिस्तानला १०० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही

२० षटकांअंती पाकिस्तान २ बाद ९९ धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाजी पाकिस्तानवर भारी पडताना पाहायला मिळत आहे.

IND vs PAK Live Score: २० षटकांत पाकिस्तानने उभारल्या अवघ्या ७९ धावा

पाकिस्तानचा जोरदार सुरू झालेला डाव संथ झाला असून २० षटकांअंती पाकिस्तानने २ बाद अवघ्या ७९ धावा केल्या आहेत.

IND vs PAK Live Score: एमएस धोनी टीव्ही समोर बसून घेतोय भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी टीव्ही समोर बसून भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.

IND vs PAK Live Score: २ विकेट्सने पाकिस्तानवरचा दबाव वाढला; ५ षटकांत पाकिस्तानने अवघ्या ११ धावा केल्या

दोन विकेट्सनंतर पाकिस्तान संघावरचा दबाव वाढला असून पाकिस्तानने १० व्या षटकानंतर पुढच्या ५ षटकांत अवघ्या ११ धावा केल्या. पाकिस्तान १५ षटकांती २ बाद ६३ धावांवर खेळत आहे.

IND vs PAK Live Score: अक्षर पटेलने सलामीवीर इमामला रनआऊट करून पाठवले माघारी; पाकिस्तान २ बाद

अक्षर पटेलने सलामीवीर इमाम उल हकला धावबाद करत पाकिस्तानला ४७ धावांवर दुसरा धक्का दिला. पाकिस्तानने पहिल्या दोन षटकांत २ बाद ५२ धावा केल्या आहेत.

IND vs PAK Live Score: हार्दिक पांड्याने ९ व्या षटकात बाबर आझमला पाठवले माघारी

आज पाकिस्तानी सालामीवीर बाबर आझम चांगल्या लयमध्ये दिसत होता. त्याने ५ चौकार ठोकत २३ धावा उभारल्या. पण ८.२ षटकात हार्दिक पांड्याने त्याला बाद केले. पाकिस्तानला ४१ धावांवर पहिला धक्का दिला.

IND vs PAK Live Score: पहिल्या पाच षटकात पाकिस्तानने उभारल्या बिनबाद २५ धावा

पहिल्या ५ षटकांत २५ धावा उभारल्या. ज्यामध्ये मोहम्मद शमीने पहिल्या षटकात एकूण ५ वाईड टाकले. तर बाबर आझमने दोन षटकार ठोकले.

रोहितला नाणेफेक जिंकता आलेली नाही

२०२३ च्या वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापासून भारताने आता सलग १२ वेळा नाणेफेक गमावली आहे. भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हमनध्ये कोणताच बदल केलेला नाही.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली

मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फखर जमानच्या जागी इमाम उल हक याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली आहे. रोहित म्हणाला नाणेफेक गमावल्याने काही फरक पडत नाही आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती.

IND vs PAK Live Updates: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुबईमध्ये दाखल

संघाबाहेर असणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारत-पाकिस्तान सामन्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर उपस्थिती लावली आहे. जसप्रीत बुमराहने यावेळी मैदानावर जाऊन मोहम्मद शमी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग यांच्यासह सर्व खेळाडूंची भेट घेतली.

jasprit bumrah in Dubai IND vs PAK Live Updates: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पाकिस्तानने मिळवलेत भारतावर अधिक विजय; जाणून घ्या रेकॉर्ड

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा रेकॉर्ड पाहता भारत-पाकिस्तान यांच्यात ५ सामने झाले आहेत आणि पाकिस्तान ३-२ अशा जय-पराजयाच्या आकडेवारीसह आघाडीवर आहे.

IND vs PAK Live Updates: दुबईच्या मैदानावर पाकिस्तावर राहिलयं भारताचं वर्चस्व

- दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताने शेजाऱ्यांना पराभवाची चव चाखवली आहे.

- संयुक्त अरब अमिरातीत भारत-पाकिस्तान यांच्यात एकूण २८ सामने खेळले गेले. शाहजाह येथे झालेल्या २४ पैकी १८ सामन्यांत पाकिस्तान, तर ६ सामन्यांत भारत जिंकला. दुबईत भारताने दोन्ही सामने जिंकले, तर अबु धाबीत २ पैकी प्रत्येकी १-१ सामने दोन्ही संघांनी जिंकला आहे.

IND vs PAK Live Updates: पटणामध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीसाठी चाहत्यांकडून हवन

बिहार, पटणामध्ये आजच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी व भारताच्या विजयासाठी चाहत्यांकडून हवन करण्यात आला आहे.

IND vs PAK Live Updates: भारतीय संघ कोणत्या पाकिस्तानी गोलंदाजाला करणार टार्गेट; शुभमन गिलने सर्व स्पष्ट सांगितलं

या सामन्याकडेही इतर सामन्यांप्रमाणेच पाहात असल्याचे शुभमन गिलने सांगितले. त्याने सांगितले की प्रत्येक सामन्याप्रमाणे हा सामनाही जिंकण्याचाच भारताचा प्रयत्न असेल. याशिवाय कोणत्या एका गोलंदाजाला लक्ष्य केले जाणार यावर देखील त्याने भाष्य केले.

IND vs PAK Live Updates: पाकिस्तानचे पारडे जड, कारण...! युवराज सिंग शेजाऱ्यांच्या बाजूने बोलला, शाहिद आफ्रिदी होता सोबतीला

पाकिस्तानी खेळाडू त्यांचा संघ कसा वरचढ आहे असे सांगत असताना भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग यानेही शेजाऱ्यांची बाजू वरचढ असेल असे मत व्यक्त केले आहे. युवीने त्यामागचं कारणही सांगितलं आहे आणि त्यामुळे भारतीय चाहते काहीसे चिंतीत झाले आहेत.

IND vs PAK Live Updates: भारताच्या विजयसाठी प्रयागराजमध्ये पुजा, आरतीचे आयोजन

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात आज पाकिस्तानविरूद्ध भारतीय संघाच्या विजयासाठी पुजा व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

IND vs PAK Probable Playing XI: संभाव्य प्लेईंग इलेव्हन

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा/अर्शदीप सिंग.

पाकिस्तान - इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकिल, मोहम्मद रिझवान (कर्णधार/यष्टीरक्षक), सलमान आघा, तय्यम ताहिर, कुशदील शाह, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ, अब्रार अहमद

IND vs PAK Match Live Updates: भारताच्या विजयासाठी वाराणसीत हवन

आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाच्या विजयासाठी वाराणसीतील चाहत्यांनी हवन केला आहे.

IND vs PAK Live Telecast : लाईव्ह प्रक्षेपण

भारत आणि पाकिस्तान संघात होणारा सामना भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवर, स्पोर्ट्स १८ चॅनेल्सवर पाहाता येणार आहेत. तसेच जिओहॉटस्टार या ओटीटी ऍप किंवा वेबसाईटवर देखील हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

Today IND vs PAK Match Time & Venue : सामन्याचे ठिकाण आणि वेळ

ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने होत असल्याने भारताचे सामने दुबईत होत आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ सामन्याच्या दोन दिवस आधीच दुबईत पोहोचला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल, तर दुपारी २ वाजता नाणेफेक होईल.

India vs Pakistan Dubai Weather Today : दुबईत कसे असेल हवामान?

दुबई स्टेडियमवरील खेळपट्टी सामन्यादरम्यान खूप बदलत नसल्याने नाणेफेकीचे महत्त्व वाढणार नाहीये जी चांगली बाब मानली जात आहे. सामना चालू होताना जरा गरम हवा असते नंतर हवा गार व्हायला लागते. अजून खेळाडूंना दुसऱ्या डावात सूर्य अस्ताला गेल्यावर मैदानावर किती दव पडेल आणि त्याचा काही परिणाम खेळावर होईल का, याचा खरा अंदाज लागत नाही.

India vs Pakistan CT Squad 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन्ही संघ

Champions Trophy India Squad 2025:

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

Champions Trophy Pakistan Squad 2025:

पाकिस्तान - मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, कामरान घुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, इमाम-उल-हक

India vs Pakistan Head to Head In ODI: अशी आहे आमने-सामने आकडेवारी

भारत आणि पाकिस्तान संघात आत्तापर्यंत वनडेमध्ये १३५ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील भारताने ५७ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. तसेच ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.

गेल्या १० वर्षांत मात्र भारताचे वर्चस्व राहिले आहे. २०१५पासून भारत आणि पाकिस्तान संघात ९ वनडे सामने खेळवण्यात आले असून ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर १ सामने पाकिस्तानने जिंकला आहे. १ सामना अनिर्णित राहिला आहे.

India vs Pakistan Match Live Updates:

भारत विरुद्ध संघात आज (२३ फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सामना होणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे.

याआधी पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले आहे. मात्र, पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय गरजेचाच आहे, तर भारतीय संघाने विजय मिळवला, तर ते उपांत्य फेरीतील जागा जवळपास पक्के करतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.