बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र आहेत निशांत कुमार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच निशांत कुमार राजकारणात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत.
काही दिवसआधीच निशांत कुमार यांनी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर केलेल्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिले होते.
आता पाटणामधील जदयूच्या कार्यालयाबाहेर निशांत कुमार यांचे एक मोठे बॅनर लागले आहे.
या बॅनरच्या माध्यमातून जदयू कार्यकर्त्यांनी निशांत कुमार यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे.
पक्ष कार्यालयाबाहेर लागलेल्या बॅनरवर 'बिहार करे पुकार...आइए निशांत कुमार ....' असं लिहिलेलं आहे.
निशांत यांनी आपले शालेय शिक्षण पाटणा केंद्रीय विद्यालयातून घेतले.
झारखंडमधील रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) मेसरा येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली.
आता आगामी काळात निशांत कुमार खरंच सक्रीय राजकारणात पदार्पण करतात की, राजकारणापासून काही हात दूरच राहतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.