नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे उड्डाणपुलावर एसटी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटीमध्ये आग लागताच प्रसंगावधान राखत बस चालकाने एसटीला बाजूला घेत सर्व प्रवशांना सुखरुप खाली उतरवलं. सर्व प्रवासी पटापट खाली उतरल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही. तुर्भेवरुन पनवेलच्या दिशेने ही बस जात होती. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.