फोटोची धमकी देऊन मागितली खंडणी
Marathi February 24, 2025 06:24 AM

फोटो व्हायरलची धमकी देऊन तरुणीकडून खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा नोंद होताच एकाला पोलिसांनी अटक केली.

तक्रारदार तरुणी ही घाटकोपर परिसरात राहते. काही वर्षांपूर्वी ती एका खासगी पंपनीत कामाला होती. तिथे काम करणाऱ्या सुपरवायझरसोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्याचा वाढदिवस असल्याने त्याने तरुणीला भेटण्यासाठी अंधेरी येथे बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने तिचे मोबाईलवर काही फोटो काढले होते.  फोटो व्हायरलची धमकी देऊन तो तरुणीला वारंवार धमकावत असायचा, तिच्याकडे पैशाची मागणी करायचा. त्याने नुकतेच तरुणीकडे 70 हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. नकार देताच त्याने तिचे फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवले.

ते फोटो पाहून तरुणीला धक्काच बसला. घडल्याप्रकरणी तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.