मार्केटमध्ये ‘या’ शेअर्सचा धुमाकूळ, गुंतवणूकदार झाले करोडपती, 1 लाख गुंतवले 1 कोटी मिळाले
Marathi February 24, 2025 06:24 PM

शेअर बाजार: गेल्या चार चे पाच महिन्यांपासून शेअर बाजाराची (Stock market) स्थिती वाईट आहे. कारण शेअर बाजारात सातत्यानं चढ उतार होत आहे. पण यादरम्यान एक स्टॉक गेल्या 6 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहे. इंडो थाई सिक्युरिटीज लिमिटेडच्या (Indo Thai Securities) शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. इंडो थाई सिक्युरिटीजच्या समभागांनी गेल्या सहा महिन्यांत 5 पटीने जास्त पैसे वाढवून मिळाले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. या शेअरने 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना श्रीमंत केले आहे.

एक लाख गुंतवणारे झाले करोडपती

इंडो थाई सिक्युरिटीज लिमिटेडच्या स्टॉकने 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना श्रीमंत केले आहे. 3 एप्रिल 2020 रोजी त्याची शेअर किंमत 14.70 रुपये होती. तर गेल्या आठवड्यात शुक्रवारी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, बाजारातील घसरण असूनही, हा समभाग रॉकेट वेगाने पुढे गेला आणि 2,035 रुपयांच्या पातळीवर गेला. त्याची बंद किंमत 1,993 होती. म्हणजेच या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना 13457 रुपये दिले. 82 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांना मोठा परतावा

सोप्या शब्दात सांगायचे तर, जर एखाद्याने पाच वर्षांपूर्वी इंडो थाई सिक्युरिटीजच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आज 1.35 कोटी रुपयांहून अधिक मिळाले असते. म्हणजेच कंपनीचे शेअर्स 1 लाख रुपयांना 14.70 रुपयांना विकत घेतले. दरम्यान, मूल्य वाढल्यानंतरही त्यांनी शेअर्स विकले नसते आणि ते होल्डवर ठेवले असते, तर आज त्यांनी त्यात गुंतवलेल्या पैशाचे मूल्य 1.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

कंपनी काय करते?

इंडो थाई सिक्युरिटीज, 1995 मध्ये स्थापन झालेली कंपनी, एक स्टॉक ब्रोकर कंपनी आहे. जी रिअल इस्टेट, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि IFSC सारख्या अनेक कंपन्यांसाठी सेवा प्रदाता म्हणून काम करते. याशिवाय, हे भारतीय इक्विटी मार्केट (BSE आणि NSE), फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग सेवा देखील प्रदान करते. त्याचे बाजार भांडवल 2,200 कोटी रुपये आहे. कंपनीने 21 सप्टेंबर 2021 रोजी 1 रुपये, 22 सप्टेंबर 2022 रोजी 1 रुपये, 15 सप्टेंबर 2023 रोजी 60 पैसे, 13 फेब्रुवारी 2024 रोजी 1 रुपये आणि 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रति शेअर 60 पैसे यासह अनेक वेळा गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सने 502 टक्के आणि सहा महिन्यांत 471.39 टक्क्यांपर्यंत उत्कृष्ट परतावा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Investment Plan : कमी गुंतवणूक, अधिक नफा! 20 हजार रुपयांच्या पगारात कसं कराल 1 कोटीचं नियोजन?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.