Obesity in Women: वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित ‘या’ समस्या होऊ शकतात….
GH News February 24, 2025 07:10 PM

आजकालच्या वयस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. आजच्या काळीमध्ये हिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. महिलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन करणे. जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये खराब चरबी जमा होण्यास सुरूवात होते. शरीरातील अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढू लागतो. बऱ्याचदा कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमच्या शरीरातील मंदावतो ज्यामुळे खराब चरबी वाढू लागते.

तुमच्या शरीरातील चयापचय मंदावल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय केले पाहिजेल ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानि होणार नाही. शरीरातील लठ्ठपणा वाढल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि सांधेवाताच्या समस्या होऊ शकतात. चला तर जाणीन घेऊया वजन वाढण्याचे मुख्य कारण काय आणि त्यावर काय औषध घेऊ शकतो.

लठ्ठपणा केवळ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वढत नाही तर त्याची इतरही कारणे असू शकतात. लठ्ठपणाच्या समस्या आनुवंशिकही असू शकतात. जर तुमच्या घरातील एखाद्या लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणाच्या समस्या पिढ्यानं पिढ्या होऊ शकतात. याशिवाय, शारीरिक हालचाली कमी केल्यामुळे लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला माहिती आहे का? औषधांमुळे लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात औषध खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते. औषधांमधील अँटीडिप्रेसस आणि हार्मोनल घटक तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. जास्त प्रमाणात तेलकट, जंक फूड आणि गोड पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. जास्त प्रमाणात या सगळ्या पदार्थांचे सेवन खाल्ल्यामुळे लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात. वाढलेल्या वजनामुळे पीसीओडी किंवा पीसाओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम यांच्या सारखे आजार होऊ शकतात. वाढलेल्या वजनामुळे आणि जंक फूडच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होण्यास मदत करतात. नियमित झोप पूर्ण नाही झाल्यामुळे आणि कामाच्या व्यापामुळे तुम्हाला मेंदूमध्ये ताण निर्माण होतो आणि अनियमित पाळी सारख्या सामस्या होऊ शकतात. अनियमित पाळीमुळे आणि लठ्ठपणाच्या समस्यांमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो. अनेक तज्ञं तुम्हाला पाळी नियमित होण्यासाठी औषध देतात. परंतु या औषधांमुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होण्यास मदत होते.

वाढत्या लठ्ठपणामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयरोविकाराचा धोका वाढतो. मधुमेह हा देखील लठ्ठपणाशी संबंधित एक गंभीर आजार आहे. जेव्हा शरीरात जास्त चरबी जमा होते तेव्हा इन्सुलिन हार्मोन योग्यरित्या कार्य करत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. याशिवाय, लठ्ठपणामुळे सांध्यावर जास्त दबाव येतो, ज्यामुळे संधिवात आणि गुडघेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि गर्भधारणेदरम्यान समस्या येऊ शकतात. यामुळे थायरॉईडची समस्या देखील उद्भवू शकते. याव्यतिरिक्त, लठ्ठपणामुळे कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो, विशेषतः स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

वजन कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो….

दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाल करा.

फायबर, प्रथिने आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खा.

दररोज 7-8 तास झोप घ्या.

योगा आणि ध्यान करून ताण कमी करा.

दिवसभरात कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.