आजगावात ३० जणांचे रक्तदान
esakal February 24, 2025 09:45 PM

47357

आजगावात ३० जणांचे रक्तदान

शिबिरास प्रतिसाद ः ‘ऑन कॉल’, शिवप्रेमी मंडळाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः शिवप्रेमी मित्रमंडळ, आजगाव-धाकोरे व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रविवारी (ता. २३) जिल्हा परिषद पूर्वप्राथमिक केंद्रशाळा आजगाव क्र. १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते विलासानंद मठकर होते. व्यासपीठावर तथा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते सदानंद गवस होते. सुशील कामटेकर, आजगाव केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव, शिक्षक दत्तगुरू कांबळी, शिवप्रेमी मित्रमंडळाचे बाळकृष्ण हळदणकर, अनंत पांढरे, प्रतीक भगत, प्रसाद मेस्त्री, पडवे मेडिकल कॉलेज रक्तपेढीचे मनीष यादव, निवृत्त शिक्षक अनिल गोवेकर, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे जिल्हा सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर आदी प्रमुख उपस्थित होते.
बाबली गवंडे यांनी संस्थेच्या कार्यप्रणालीविषयी माहिती देताना शिवप्रेमी मित्रमंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करताना ऑन कॉल रक्तदाते संस्थेला सहभागी करून घेतल्याबद्दल मंडळाचे आभार मानले. विलासानंद मठकर यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था ही संस्था नित्यनेमाने रक्तदान क्षेत्रात करीत असलेल्या सत्कार्याबद्दल आणि संस्थेने आवाहन करताच रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिवरायांचे स्मरण करून प्रतिवर्षी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेत असल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी रामदास परब, रामा रेवाडकर, सदाशिव तिरोडकर, गुरुनाथ गवंडे, संदीप तेली, विष्णू हरमलकर, दत्ताराम पांढरे, संकेत वाडकर, नितीन मुळीक, साईश वाडकर, अमोल गोवेकर, शिवनंदन आजगावकर, मंदार आजगावकर आदींनी मेहनत घेतली. अनिल गोवेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक भगत यांनी प्रास्ताविक केले. बाळकृष्ण हळदणकर यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.