प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीच्या (Prajakta Koli) घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. नुकताच प्राजक्ताचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ता कोळीचा 2023 मध्ये साखरपुडा पार पडला. ती बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. प्राजक्ता आणि वृषांक 13 वर्षे एकमेकांसोबत आहेत.
कोळीचा होणार नवरा वृषांक हा मूळचा आहे. सध्या प्राजक्ता कोळीच्या मेहंदी समारंभातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता आई आणि नवऱ्यासोबत जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने कुटुंबासोबत 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर डान्स केला आहे. प्राजक्ता, प्राजक्ताची आई आणि प्राजक्ताचा होणारा नवरा 'झिंगाट' गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे.
प्राजक्ताच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. प्राजक्ताने लाल रंगाचा सूट परिधान केला होता. फोटोंमध्ये प्राजक्ता आणि वृषांक मेहंदी समारंभाची मजा घेताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता कोळी 25 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.
प्राजक्ता कोळीला युट्यूबमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिने 'जुग जुग जियो' चित्रपटात देखील काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्राजक्ता कोळी ही 'मोस्टलीसेन' या नावाने ओळखली जाते.