Maharashtra Live Update : आठ दिवस मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट राहणार बंद
Saam TV February 24, 2025 10:45 PM
आज पासून आठ दिवस मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट राहणार बंद

आज पासून आठ दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गा वरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील 8 दिवस वाहतूक बंद ची घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.

नगर तालुक्यातील खंडोबा माळ येथील कसबे वस्तीवर सशस्त्र दरोडा..

मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास पडला दरोडा...

दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी..

लहानु विठोबा कजबे वय 58 वर्ष, अशोक लहानू कजबे वय 40 वर्ष, जनाबाई लहानु कसबे वय 51 वर्ष अशी मारहाणीतील जखमींची नावे...

जखमींना उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात केले दाखल..

दरोडेखोरांनी सोने आणि हजारो रुपयांचा ऐवज केला लंपास..

या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण..

दरोडेखोरांचा तत्काळ तपास लावून संरक्षणाची कुटुंबीयांनी केली मागणी..

अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल...

शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष बळीद यांचे अपघाती निधन

संतोष बळीद हे आपल्या सहकाऱ्यांसह नाशिक येथून लासलगाव मार्गे मनमाड येथे परत येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास वाहेगाव शिवारात त्यांच्या झायलो गाडीचा अपघात झाला स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने गाडीने उधळी आणि चार ते पाच तिच्या खात ती रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली यात 4 जण जखमी झाले तर संतोष बळीद यांचे मात्र निधन झाले,गेल्या 40 वर्षा पासून ते शिवसेनेच्या अनेक आंदोलनात सहभागी होत अनेक प्रश्नांवर जनतेच्या समस्या सोडवत राहिले तर शिवसेना फुटीनंतर सुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले,त्यांच्या निधनाने मनमाड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे,

पंढरपूरच्या चळे गावात तीनशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख सापडला

पंढरपूर तालुक्यातील चळे गावात पुरातन व ऐतिहासिक गोलघुमटामध्ये एक शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा असून निजामाच्या काळात बहिर्जी पाटील यांनी हा घुमट बांधल्याचे यातून समोर आले आहे. या शिलालेखाचा पुरातत्व विभागाने सखोल अभ्यास करावा अशी मागणी येथील इतिहास प्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. शिलालेख पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करू लागले आहेत.

दहावी- बारावीच्या परीक्षा केंद्रावर खाजगी क्लासेसचे शिक्षक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक दहावी – बारावीच्या परीक्षा केंद्रावर खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून काम करतायत. तेच शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी काम करीत आहेत. फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आडगाव बुद्रुक येथील काशीराम विद्यालयाच्या नावावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९, तर खासगी इंग्रजी शाळांचे दोन शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असल्याची बाब उघड झाली आहे.

Maharashtra Live Update : पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी देणार राजीनामे

पुणे शहरातील काँग्रेस पदाधिकारी लवकरच करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसचे आठ ते दहा पदाधिकारी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यासोबत या पदाधिकाऱ्यांनी केली प्राथमिक बैठक

येत्या आठ ते दहा दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा होणार प्रवेश

पुणे शहर काँग्रेस मधील अंतर्गत नाराजीमुळे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे शहर काँग्रेसमध्ये समन्वय नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांचा निर्णय

पक्षाकडून होत असलेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि दाद न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

Nagpur News : पारडी पुलाचे वरील भाग कारवर तुटून पडल्याने नुकसान, पारडी पोलिसांत गुन्हा दाखल Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर महत्वपूर्ण सुनावणी

- अत्यल्प उत्पन्न दाखवून कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलीय २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड

- या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात केलंय अपिल

- आज सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

- सत्र न्यायालयात कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की दिलासा मिळणार?

Nagpur - ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या नागपूर खंडपीठाचा सवाल

- नागपूरातील वाढतं ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी काय उपाययोजना संदर्भात, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला विचारणा

- राज्य सरकारसह प्रतिवादींना सात मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

-विदर्भ हेरिटेक सोसायटीच्या अवंतीका चिटणीस यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केलीय

- पर्यावरण विभाग, गृह विभाग, नागपूर मनपा, नागपूर पोलीस आयुक्त, प्रदुषण नियंत्रण मंडळाला नोटीस

- ईमारत बांधकाम, सिमेंट रस्ते बांधकाम यामुळे सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होत असल्याचा याचिकेत उल्लेख

- ध्वनी प्रदूषणात केलेल्या तक्रारीवर संबंधित विभागणी तक्रारी करून दखल न घेल्याचा याचिकेत उल्लेख.

Nagpur - 100 वर्षानंतर प्रथमच अतिक्रम हटवण्यासाठी होणार फुटाळा तलाव परिसरात मोजमाप

- अतिक्रमण हटवण्यासाठी आज फुटाळा तलाव पाणलोट क्षेत्राचे मोजमाप

- शंभर वर्षांनंतर प्रथमच फुटाळा तलावाचा मोजणी भूमी-अभिलेख विभागाच्या सिटी सर्व्हे कार्यालय पथकाद्वारे आज केली जाणार आहे.

- तलावाच्या काही पाणलोट क्षेत्राचा देखील मोजणी केली जाणार आहे.

- मोजणीच्या निष्कर्षांनुसार, अतिक्रमण हटवून सार्वजनिक बांधकाम विभागआणि महाराष्ट्र प्राणी व मत्स्य विज्ञान विद्यापीठ सरकारी जागेचा ताबा घेईल आणि अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

- माजी नगरसेवक कमलेश चौधरी आणि कुटुंबीयांनी बेकायदेशीर तलावाचा काही भाग आणि पाणलोट क्षेत्र माती टाकून भरून लॉन विकसित केल्याचं आरोप

-

Nashik News :धक्कादायक बातमी नाशिकमधून, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ?

- कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात आढळल्या अळ्या

- आडगाव शिवारात असलेल्या टाकेकर शिक्षा संकुलातील गंभीर प्रकार

- निकृष्ठ जेवण दिले जात असल्याच्या यापूर्वीही विद्यार्थ्यांनी केल्या होत्या तक्रारी

- जेवणात अळ्या आढळून आल्याचं विद्यार्थ्यांनी पालकांनाही कळवलं

- जेवणाच्या ताटात अळ्या आढळून आलेल्याचे फोटो समोर

- मेस चालकांवर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कारवाई झाली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

Crime News : नागपूर पारडीतील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी सिमेंट काँक्रीटचा तुकडा एका युवकाच्या कारवर पडल्यानंतर आता गुन्हा दाखल..

याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी कारमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला

- कारमालक विशेष श्रीवास्तव यांच्या गाडीवर पारडी उड्डाणपुलाच्या प्लास्टरचा एक तुकडा कारवर पडला

- यामध्ये कारचे जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले

- श्रीवास्तव यांनी कारचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वाठोडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली

- याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी लेखी तक्रारीवरून घटनेस जबाबदार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला

- यात पोलीस संबंधित व्यक्तीस शोधण्यासाठी बांधकाम केलेल्या संबधीत विभागम पत्रव्यवहार करून माहिती मागावणार, त्यानंतर जवाबदार व्यक्तीचा शोध घेतला जाईल.

Agro News : पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात

नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणी पातळी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. जिल्ह्यातील मुखेड तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी-मार्च महिन्यातच या भागातील पाणी पातळी खालावत असते.दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई या भागात जाणवते. नदी-नाले,विहिरी आणि बोरचे पाणी आटल्यामुळे हाता-तोंडाला आलेले गव्हाचे पिक आता करपू लागल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Crime News : घणसोलीच्या चोराला उल्हासनगर गुन्हे शाखेने केली अटक

घणसोली येथील मीना हॉस्पिटल जवळील बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावरील घरामध्ये खिडकीवाटे प्रवेश करून जवळपास लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाणे येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेश जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की शिळफाटा येथे राहणारा अभिषेक उर्फ मोनू उर्फ पंकज राजाराम राजपूत याने चोरी केली आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेनं त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने घणसोली येथून चोरी केलेल्या मुद्देमालातील एक 20 हजार रुपयांची सोन्याची अंगठी हस्तगत केली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला मुद्देमालासह रबाळे पोलीस ठाणे यांच्या स्वाधिन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.

badalapur : बदलापुरात रंगला वासराच्या बारशाचा अनोखा सोहळा

बदलापूर गावातील ठाकूरवाडीत चक्क वासराचा बारश्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं.आपल्या गायीवरील प्रेमापोटी गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.

दारात रांगोळ्या, घराला फुग्यांची सजावट हा काही कुणा मुलाच्या बारशाचा कार्यक्रम नव्हता तर हा होता गायीच्या वासराचा नामकरण विधी...बदलापूर गावातील ठाकूरवाडीत वासराच्या बारशानिमित्त मटणाचं गावजेवण ठेवण्यात आलं होतं. इथले रहिवासी गुरुनाथ कडाळी यांच्या लाडक्या गौरा या गायीने सहा वर्षानंतर वासराला जन्म दिला. त्यामुळे कडाळी कुटुंबामध्ये आनंदाचा पारावार उरला नाही , तसच गौरा ही कडाळी कुटुंबातील नव्हे तर संपूर्ण ठाकुरवाडीतील एकमेव गाय...त्यामुळे गुरुनाथ कडाळी यांनी या गायीच्या वासराचा नामकरण विधी करायचा ठरवलं. त्या साठी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढला आणि त्यानंतर वासराचा नामकरण विधी पार पडला. वासराला ओवाळून त्याला कुंकवाचा टीका लावून त्याला हार घालण्यात आला. त्यानंतर त्याचं नाव 'छोटा बकासुर' ठेवण्यात आलं. बकासुर महाराष्ट्रात शर्यतीमध्ये नावाजलेला बैल आहे. त्याच्याच नावावरुन वासराचं नाव छोटा बकासुर ठेवण्यात आलं असं गुरुनाथ कडाळी यांनी सांगितलं.

Rain News : सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे साटेली- भेडशी गावासह घोडगे गावाला मोठा फटका बसला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास गडगडाटासह वादळी वारे व गारांचा पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्याचींच ताराबंळ उडाली. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या गावात शेतकऱ्याच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. जवळपास 45 ते 50 हजार केळी वादळा मुळे जमीनदोस्त झाल्या. यात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे जंगली हत्तीचा उपद्रव तर दुसरीकडे निसर्गाने दिलेला तडाखा यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास यामुळे शेतकऱ्यांचा हिरावला गेला आहे. आता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Sangli Crime : नशेच्या गोळ्यांची वाढीव दराने विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद.

नशेच्या गोळ्यांची वाढीव दराने विक्री करणाऱ्या मेडिक दुकानातील कामगारास पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. या तरुणांकडून मानवी शरीरावर अपायकारक करणाऱ्या १८ हजार रुपये किंमतीच्या ८९० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी जुनेद शब्बीर शेख याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिरजेतील मार्केट परिसरात सदरची कारवाई केली. पोलीस चौकशीत त्याने सदरचा औषध साठा तो कामास असलेल्या मिरजेतील वडगावकर हॉस्पिटलच्या मेडिकलमधून चोरुन आणल्याची कबुली दिली.

Tuljapur Crime : तुळजापुरात एकाच राञीत चार घरफोड्या - दोन चोरटे सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद

तुळजापुरात एकाच राञीत चोरट्यांनी चार घरफोड्या केल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान शहरातील तुळजाई नगरातील दोन घरे लगतच्या शिंदे प्लॉटिंगमध्ये दोन घरे असे एकुन चार घरे फोडण्यात आली आहेत.यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर घरगुती साहीत्य चोरी केले आहे तर शहरातील शिंदे प्लॉटिंगमध्ये म्हेञे यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली असुन घरात घुसलेल्या दोन चोरट्यांचा चेअरा देखील स्पष्ट दिसत आहेत.दरम्यान सीसीटीव्ही फुटेल च्या आधारे चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हाण असणार आहे.दरम्यान या वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jalgaon News : जळगावात श्री सिद्धी महागणपती मंदिराच्या आवारात देशी गायींवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करणाऱ्या सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण...

जळगाव शहरानजीकच्या श्री सिद्धी महागणपती मंदिराच्या आवारात ७२०० स्क्वेअर फूट जागेवर देशी गायींवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल उभारले गेले.या ठिकाणी अपघातात जखमी, कॅन्सरग्रस्त, आजारी गायींवर तज्क्ष डॉक्टरांच्या चमूकडून अत्याधुनिक यंत्रांचा उपयोग करून उपचार केले जाणार आहे. तसेच पौष्टिक आहारासह गायींना राहण्याची खास व्यवस्था देखील केली जाणार आहे.याच देशातील या पहिल्या हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे.

जळगाव च्या पाळधी येथील या रुग्णालयात केवळ देशी गायींवरच उपचार करून त्यांची कायमस्वरूपी देखभाल केली जाणार आहे. यासाठी मंदिर परिसरात ३० लाख रुपये खर्चुन पाच खोल्यांची इमारत व मोठे शेड उभारले गोले आहे.या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गो मातेवर उपचार केले जाणार आहेत.

Jalgaon Crime : ऑफीसमधील ड्रॉवरतोडून आत ठेवलेले ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगावातील एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीतून अज्ञात तीन चोरट्यांनी कार्यालयात तीन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिग्नेश शरद शेठ यांची एमआयडीसी सेक्टर ई मध्ये ग्रीन एन इको सोल्युशन नावाची कंपनी आहे. दरम्यान शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीची दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफीसमधील ड्रॉवरतोडून आत ठेवलेले ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा सर्व प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीला आल्यानंतर कंपनीचे मालक जिग्नेश शरद शेठ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SSC Exam News : यवतमाळच्या कोठारी येथील पेपरफूटी प्रकरणात पोलिस तिसऱ्या आरोपीच्या शोधात

परिक्षा केंद्राची मान्यता रद्द होण्याची शक्यता? पेपरफुट प्रकरणी शिक्षण मंडळाकडे अहवाल

कोठारी येथील आदर्श महाविद्यालयात मराठीचा पहिलाच पेपर व्हायरल झाला होता

महागांव पोलिसांनी दोघांना अटक करून सुचना पत्रावर सोडले,पेपर फुटीप्रकणी केंद्रसंचालकांना पदावरून हटवले

पेपर व्हायरल करण्यासाठी बाहेरचा व्यक्ती आत आला कशा? मराठीचा पेपर बाहेर गेला यासाठी केंद्र संचालक जबाबदारच,पोलिस

Yavatmal Crime : यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातून हातकडीसह चोरटा पसार,एलसीबी पथकाने चोरट्याला केली होती

सात वर्षांपासून फरार असलेला अट्टल चोरट्याला एलसीबी पथकाने काही तासापूर्वी अटॅक करण्यात आली होती

आरोपीला लोहारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात दिल्यानंतर,लॉकअप करण्यासाठी घेऊन जात असताना आरोपीने झटका मारून पोलीस ठाण्यातून धूम ठोकली

बबलू तायडे राहणार शिवाजीनगर लोहारा असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहेत

सात वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर कोठडीत डांबण्यासाठी आरोपीला बेड्या लावून नेत असताना अट्टल चोरटा आरोपी झाला पसार

New Delhi News : दिल्ली - 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात 80 पुस्तकांचे प्रकाशन

दिल्लीत सुरु असणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात तब्बल 80 विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला.यामध्ये कृषी पर्यटनावर आधारित गणेश चप्पलवार यांच्या पुस्तकाचे ही प्रकाशन करण्यात आले.

Agro News : यवतमाळ जिल्ह्यात आज पासून सीसीआयची कापूस खरेदी

सीसीआयने तांत्रिक कारण देऊन गेल्या 14 दिवसांपासून कापूस खरेदी बंद केली होती त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी खाजगी व्यापाऱ्याकडे वळला मात्र तब्बल 14 दिवसानंतर सीसीआयने आजपासून कापूस खरेदी सुरू करणार असल्याचे पत्र बाजार समितीत धडकले असून पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

nanded : येरगी गावात मातृ-पितृ दिवस साजरा

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील येरगी गावात मातृ पितृ दिवस साजरा करण्यात आलाय. गावातील वेशीवर मारुती मंदिराच्या परिसरात आई-वडिलांसमोर त्यांच्या मुला-मुलींना बसवण्यात आले.यावेळी मुला-मुलींनी आईवडिलांचे पाय धुवून पूजन केले. आई-वडिलांनी मुलांना आशीर्वाद देत मिठी मारली. कार्यक्रमामुळे आई-वडील व माता पिता यांच्यातला जिव्हाळ्या कायम राहावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय.

Palghar Local News

पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील एव्हिओ फार्मासिटिकल कंपनीवर काल रात्री उशिरा केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे.आफ्रिकन देशांमध्ये बंदी असलेलं ट्रॉमाडोल , टेपेटाडेल, केरेसेप्रोडॉल या नशिल्या औषधाच या कंपन्यांमध्ये उत्पादन घेतलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे . या कारवाईत औषधांचा मोठा साठा जप्त केला असून घाना आणि नायजेरिया या देशांमध्ये बंदी असताना देखील बोईसर तारापूर एमआयडीसीत उत्पादन घेऊन त्याची थेट निर्यात या दोन देशांमध्ये केली जात असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे राज्याने केंद्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या या कारखान्यावर छापा टाकला असून उत्पादन बंदीचे निर्देश प्रशासनाकडून कंपनीला देण्यात आले आहे.

Pune GBS : राज्यात जी बी एस रुग्णांची संख्या २१६ वर

५०-५९ वयोगटात व्यक्तींना सर्वाधिक जी बी एस रोगाची लागण

राज्यात ५० - ५९ वयोगटात असलेल्या ३२ व्यक्तींना जी बी एस ची लागण

एकूण जी बी एस रुग्णांपैकी ४३ पुणे महापालिका तर ९६ रुग्ण हे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आले आढळून

३२ रुग्ण हे पिंपरी चिंचवड मधून तर पुणे ग्रामीण भागातून ३३ आणि १२ रुग्ण इतर जिल्ह्यातील असल्याची आरोग्य विभागाकडून माहिती

एकूण रूग्णांपैकी १९ रुग्ण व्हेंटिलेटर वर

१५८ जणांना रुग्णालयातून देण्यात आला आहे डिस्चार्ज

Teachers : शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी हजारो पात्रताधारक प्रतीक्षेत आहेत

मात्र, पवित्र संकेतस्थळावर भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले आहे

२८ फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत.

पवित्र संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १ हजार २०१६ व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण १३३७ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे

सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी.

पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास edupavitra2022 @gmail. com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले

RTE News : दहा दिवसांत आरटीईअंतर्गत केवळ १३ हजार ७४० बालकांचेच प्रवेश निश्चित

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर गेल्या दहा दिवसात केवळ १३ हजार ७४० बालकांचेच प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत

यंदा राज्यातील ८ हजार ८५३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत

त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी १० फेब्रुवारी रोजी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. त्यात १ लाख १ हजार ९१६ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. प्रतिक्षा यादीत ८५ हजार ४५७ बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे

प्रवेशासाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे

आत्ता पर्यंत अहिल्यानगरमध्ये ८२४, मुंबईमध्ये ६६६, नाशिकमध्ये ६७३, पालघरमध्ये ११५७, पुण्यात १९२९, ठाण्यात २०९६ याप्रमाणे शाळा प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित जिल्ह्यात खूपच कमी प्रवेश झालेले आहेत

Pune GBS : जी बी एस रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी

पुण्यातील खडकवासला धरण परिसरातील असणाऱ्या लोकवस्त्यांमधील कोंबड्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी

कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करुन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेस परिक्षणासाठी सादर

या कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुन्यांच्या तपासणीची कार्यवाही सुरु

जी बी एस कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दूषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती

पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधीत क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरणाच्या भागातील ११ कुक्कुट परीक्षेत्रांना भेट

Pune Congress : काँग्रेसकडून पुण्यात "यंग इंडिया के बोल" कार्यक्रमाचे आयोजन

विजयी स्पर्धकांना पक्षाकडून प्रदेश आणि जिल्हा स्तरावरील प्रवक्तेपदासाठी मार्गदर्शन

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यातील काँग्रेस भवन येथे "यंग इंडिया के बोल" सीझन ५ चा ग्रँड फिनाले संपन्न

या स्पर्धेतून निवड झालेल्या स्पर्धकांना प्रदेश आणि जिल्हा स्तरावरील प्रवक्तेपद दिले गेले

"यंग इंडिया के बोल" हा युवक काँग्रेसचा टॅलेंट हंट असून, तो पक्षासाठी प्रभावी प्रवक्ते शोधतो

baba Amate Awards : डॉ. कुमार सप्तर्षी यांना ज्येष्ठ लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार

बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना ज्येष्ठ लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या हस्ते देण्यात आला. याच कार्यक्रमात ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देवून ओडिशा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात आले. जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, एक लाख रुपये असे होते , सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि पन्नास हजार रुपये असे होते.

Pune Crime : पोलिसांच्या वाहनातून पळून जाणाऱ्याला पाठलाग करून पकडले

‘मकोका’च्या गुन्ह्यातील सराइत गुन्हेगाराने पोलिसांच्या वाहनातून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला

परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला लगेच पकडले

पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील अप्पा बळवंत चौकात रविवारी सायंकाळी घडली

जयेश उर्फ जैड्या ढावरे असे आरोपीचे नाव आहे

आरोपी येरवडा कारागृहात होता. न्यायालयाने त्याला अटी-शर्तींवर नुकताच जामीन मंजूर केला होता. तो सध्या तळजाई वसाहतीत राहत होता

एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती

आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याला सायंकाळी फरासखाना- विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यासाठी नेण्यात येत होते

अप्पा बळवंत चौकाजवळ वाहनाचा वेग कमी झाला आणि याचाच फायदा घेत त्याने बेडीसह बाहेर उडी मारली

तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडलं

purndar News : रंगाच्या शिंपणाने झाली वीर येथील यात्रेची सांगता

'नाथ साहेबाचा चांगभलं' 'सवाई सर्जाच चांगभले ' असा जयघोष करत आणि रंगाची शिंपण करत....मागील तेरा दिवसापासून सुरू असलेली...पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरीदेवीच्या यात्रेची आज सांगता करण्यात आली...... मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून या यात्रेची सांगता करण्यात आली... आज दुपारी देवाच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आलं आणि यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात येऊन या यात्रेची सांगता करण्यात आली. याला मारामारी देखील म्हटले जाते... मागील तेरा दिवसापासून वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सुरू होता...आज या यात्रेचा शेवटचा दिवस होता आज देखील वीर येथे लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रा उत्सवात सहभागी झाले होते...

Pune : रवींद्र धंगेकर करणार शिवसेनेत प्रवेश?

उदय सामंत यांच्या भेटीचे फोटो स्वतः सोशल मीडिया वर केले पोस्ट

मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रवींद्र धंगेकर आणि सामंत यांची भेट

माझा चिरंजीव प्रणव याच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. उदय सामंत यांचे आशीर्वाद त्याला लाभले, याबद्दल त्यांचे मनापासून आभार, अशी पोस्ट स्वतः धंगेकर यांनी केली आहे

धंगेकर यांनी २ दिवसांपूर्वी ठेवलेल्या स्टेट्स मुळे सुद्धा ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का अशी चर्चा सुरू होती

धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस चे माजी आमदार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.