भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे. गुंतवणूकदारांचं यामुळं मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर 25 फेब्रुवारीच्या सत्रात काही स्टॉक्समध्ये घडामोडी घडू शकतात. त्या काही स्टॉक्सचा आढावा आपण घेणार आहोत. एलआयसीकडे सहायक आयुक्त , वार्ड 206, झोन 11, दिल्ली यांच्याकडून 57.28 कोटी रुपयांच्या जीएसटी, व्याज, दंड मागणीसाठीची नोटीस मिळाली आहे. ही नोटीस 2020-21 साठीची आहे. यामध्ये जीएसटी 31.04 कोटी,व्याज 23.13 कोटी, दंड 3.10 कोटी रुपयांचा समावेश आहे.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडनं मध्य प्रदेश वीज निर्मिती कंपनी सोबत ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये करार केला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी मध्य प्रदेशातील विविध भागात ग्रीन एनर्जी पार्कची उभारणी करणार आहे. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हायब्रीड ऊर्जा प्रकल्पांचा समावेश असेल.
बायोटेक्नोलॉजी फर्म बायोकॉननं अमेरिकेतील मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. येस इनटेक अमेरिकेतील बाजारपेठेत उपलब्ध असेल. येस इनटेक विविध आजारांवरील उपचारांसाठी वापरलं जातं.
टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरींग कडून पोलंडच्या नेवोमो सोबत करार केला आहे. मॅगरेल तंत्रज्ञान, एआय पॉवर्ड रेल्वे इन्नोवेशनसाठी या कराराचा फायदा होईल. याचा भारतातील आणि जगभरातील रेल्वे वाहतूक यंत्रणेतील सुलभतेसाठी फायदा होईल.
राजस्थानातील श्री सिमेंट या कंपनीला देखील बिहारच्या जीएसटी उपायुक्तांकडून 41.10 कोटी रुपयांच्या कराच्या मागणीसाठी नोटीस दिली आहे. यामध्ये जीएसटी 23.55 कोटी, व्याज 15.19 कोटी आणि दंड 2.35 कोटी रुपये आकारला जाणार आहे. दुसरीकडे ओएनजीसी त्यांच्या ओएनजीसी ग्रीन लिमिटेड या उपकंपनीत 1200 कोटी रुपये गुंतवणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा झाली.आयआरईडीएनं मान्यताप्राप्त गुंतवणूकदार संस्थांकडून 5000 कोटी रुपयांच्या उभारणीला मान्यता दिली.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित: 25 फेब्रुवारी 2025 08:15 एएम (आयएसटी)
अधिक पाहा..