Madhuri Dixit : उनसे मिली नजर…; 'धकधक गर्ल'च्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ, पाहा VIDEO
Saam TV February 25, 2025 03:45 PM

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 90चे दशक तिने गाजवले आहे. तिने हिंदीसोबत मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.

दीक्षित अभिनयासोबतच तिच्या नृत्यासाठी देखील ओळखली जाते. तिच्या दिलखेचक अदांनी ती कायम प्रेक्षकांना घायाळ करते. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने आपला एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून चाहते तिच्या पुन्हा प्रेमात पडले आहे.

माधुरी दीक्षितने 'उनसे मिली के मेरे होश उड़ गये…' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये माधुरी 'जब वो मिले मुझे पहली बार...' या गाण्यातील ओळीवर डान्स करताना दिसत आहे. तिने डान्ससाठी रेट्रो लूक केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. मरून रंगाची वेलवेट साडी नेसली आहे. हेअरस्टाइल, मोत्यांची दागिने तिने परिधान केले आहेत. गाण्यावर तिचे हावभाव, तिच्या अदा पाहून चाहते दिवाने झाले आहेत.

माधुरीने या डान्स व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "Retro vibes for the win" माधुरी दीक्षितच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. 'उनसे मिली नज़र' हे गाणे 'झुक गया आसमान' या चित्रपटाचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.