आपण कधी न कधी लिफ्टचा वापर नक्कीच केला असेल
पण लिफ्टमध्ये आरसा कशासाठी असतो हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की, लिफ्टमध्ये आरसा हा चेहरा व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी असतो.
पण ते कारण नाही, क्लाॅस्ट्रोफोबिया नावाच्या आजाराने पिडित लोकांसाठी हा आरसा लावलेला असतो.
क्लाॅस्ट्रोफोबिया चे रुग्णांना छोट्या जागेत जाण्याच्या किंवा उभा राहण्याची भीती वाटते.
यामुळे त्यांचा श्वासोश्वासाची गती वाढू शकते, हृदयाचे ठोके जलदगतीने पडू शकतात.
यामुळे लिफ्टमध्ये आरसा लावलेला असतो, ज्यामुळे लोकांना लिफ्ट मोठी वाटते आणि गर्दीही कमी वाटते, आणि गुदमरल्या सारखे वाटत नाही.