Marathi Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत दिसणार भगवान शंकराचे पंचानन महादेव रूप, पाहा 'महाशिवरात्री'चा विशेष भाग
Saam TV February 25, 2025 07:45 PM

'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) आणि 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग दाखवले जाणार आहे. प्रत्येक माणसात देव असतो त्याला नाकारू नका, हा माणुसकीची शिकवण देणारा संदेश यंदाच्या 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील महाशिवरात्री विशेष सप्ताहाचा महत्त्वाचा पैलू आहे. देवी पार्वती अक्कलकोटात एक सामान्य स्त्री म्हणून राहू लागते.

रोजचे जीवन जगण्यासाठी मदत मागू लागते. तिला गावकऱ्यांनी मदत करावी म्हणून स्वामी त्यांना भेटून प्रेरित करत आहेत पण महाशिवरात्रीच्या उत्सवात महादेवाकडून खूप काही मिळवण्याच्या धुंदीत असलेला प्रत्येक गावकरी फक्त उत्सव साजरा करण्यात मग्न आहे. त्या गरीब सामान्य स्त्रीला कोणीही मदत करत नाही.

माणसातली माणुसकी हरवलेली पाहून देवी पार्वती व्यथित होते आणि दिवशी ती सामान्य गरीब स्त्री, देवी पार्वतीमध्ये रूपांतरित होते. तिचा क्रोध अनावर होतो. तिचा राग शांत करण्यासाठी स्वामी महादेव रुपात प्रकटतात. आता वेळ आहे परिणामांची आणि आपण दोघांनी मिळून शिकवण देण्याची असे शिवपार्वती ठरवतात. इथे मंदिरातले शिवलिंग गायब होते. शिवलिंग परत मिळवण्याची माणुसकीचा मंत्र शिकवणारी दिव्य स्वामी लीला महाशिवरात्री भागात पाहायला मिळणार आहे.

'आई ' या मालिकेत महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडली आणि आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आता. आई तुळजाभवानीचे महाकाली रुपाचे प्रयोजन काय? याचा खुलासा हळूहळू मालिकेत होईलच. पण, महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान पंचानन महादेव रूप भक्तांना पाहायला मिळणार आहे.

'आई तुळजाभवानी' अवतारात असलेल्या देवी पार्वतीला महादेवांच्या भवानीशंकर रूपाची ओळख पटते. बालगणेश, अशोकसुंदरी हे कुटुंब एकत्र येते. देवी पार्वती महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवांची मनोभावे पूजा करते. देवी पार्वती म्हणते आई तुळजाभवानी अवतारात मी माझे वचन पूर्ण केले आहे. आता महादेव तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा.

महादेवांनी देवींना कोणते वचन दिले, ते 'पंचानन महादेव रूपात' का प्रकट झाले हे आपल्याला महाशिवरात्री भागात पाहायला मिळणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिका रात्री ८ वाजता आणि 'आई तुळजाभवानी' मालिका रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.