Prajakta Mali : 'बुम बुम बोंबला...' प्राजक्ता माळी अन् मृण्मयी देशपांडेचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO
Saam TV February 25, 2025 07:45 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील कलाकारांचा 'चिकी चिकी बुबूम बुम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केले आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) , प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

'चिकी चिकी बुम' चित्रपटाची गाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'बुम बुम बोंबला' हे गाणे तुफान हिट झाले आहे. याच गाण्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेने (Mrunmayee Deshpande) जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देशपांडे आणि प्राजक्ता माळी 'बुम बुम बोंबला' हुकस्टेप करताना दिसत आहे.

या व्हिडीओला एक मजेशीर कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "फिल्म रिलीज तोंडावर असताना... भेटेल त्या प्रत्येकाकडून #hookstep करवून घेणं #mandatory असतं ना…मग गाणं #western आणि #costume नऊवार का असेना…" या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची नऊवारी तर मृण्मयीने केशरी रंगाची नऊवारी नेसली आहे.

डान्स व्हिडीओमध्ये दोघी मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नम्रता संभेरावचा कॅमिओ देखील आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.