विराट कोहलीची ही गोष्ट चोरायची आहे! केएल राहुलने मुलाखतीत केला खुलासा
GH News February 25, 2025 08:12 PM

विराट कोहली हा दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम मोडीत काढले आहे. मागच्या काही दिवसात त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागलं होतं. पण पुन्हा एकदा त्याला लय मिळताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक ठोकून पु्न्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. त्याच्या फलंदाजीचं कौतुक होत आहे. यात विकेटकीपर फलंदाज केएल राहुलही मागे नाही. केएल राहुलची एक मुलाखत नुकतीच पार पडली. यात त्याला विराट कोहलीकडून कोणता शॉट चोरायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केएल राहुलने विराटच्या फ्लिक शॉटचं नाव घेतलं. खरं तर विराट कोहलीच्या कव्हर ड्राईव्हची चर्चा होत असते. पण केएल राहुलने फ्लिक शॉटला पसंजी दिली. इतकंच काय तर कोणत्या गोलंदाजामुळे रात्रीची झोप लागत नाही? या प्रश्नाचं देखील त्याने उत्तर दिलं. केएल यासाठी अफगाणिस्तानच्या राशीद खानचं नाव घेतलं. नेटमध्ये कोणत्या गोलंदाजाचा सामना करायला आवडत नाही? या प्रश्नाचं उत्तर त्याने मोहम्मद शमी असं दिलं.

केएल राहुलने कर्णधार रोहित शर्माचंही कौतुक केलं. संघात कोणत्या क्रिकेटपटूचा मेंदू तल्लख आहे. त्यावर केएल राहुलने क्षणाचाही विलंब न करता रोहित शर्माचं नाव घेतलं. तसेच पुढे ब्रॅड हॅडिनला फलंदाजी करताना सर्वात जास्त बोलणारा विकेटकीपर म्हणून शिक्कामोर्तब केलं. दुसरीकडे, संघात असा कोणता खेळाडू आहे की, सर्वात जास्त हिट मारण्याचा गोष्टी करतो? यावर केएल राहुलने हसतच मोहम्मद सिराजचं नाव घेतलं. दरम्यान केएल राहुल हा टीम इंडियाचा मुख्य विकेटकीपर फलंदाज आहे. त्यामुळे ऋषभ पंतला आता बेंचवर बसण्याशिवाय पर्याय नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुलला विकेटकीपर बॅट्समन म्हणून पसंती दिली आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध फलंदाजीला उतरला होता. तेव्हा त्याने 47 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 41 धावा केल्या. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. भारतीय संघाने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धचा सामना औपचारिक असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.