ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका सामन्याच्या निकालामुळे स्पर्धेचं चित्र पालटलं, आता करो या मरोची लढाई
GH News February 25, 2025 09:19 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे. दुसरीकडे, ब गटातून अजूनही चित्र अस्पष्ट आहे. त्यामुळे कोण उपांत्य फेरी गाठणार हे सांगणं कठीण आहे. असं असताना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील निकालाने गुणतालिकेतील गुंता वाढला आहे. या गटातील उपांत्य फेरीचं गणित आता किचकट झालं आहे. त्यामुळे या गटातील प्रत्येक सामना आता करो या मरोची लढाई असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांनी पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचं दोन्ही संघांचं स्वप्न होतं. पण पावसामुळे या स्वप्नावर पाणी पडलं आहे. कारण हा सामना नाणेफेक होण्याआधीच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला आहे. साखळी फेरीतील सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने त्याचा फटका या दोन्ही संघांना बसला आहे. आता दोन्ही संघांना उपांत्य फेरीसाठी पुढचा सामना जिंकणं भाग आहे.

पावसाबाबत शेवटचा अपडेट घेतले गेले आणि सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली . सकाळपासून पाऊस पडत होता आणि मैदानातील कर्मचाऱ्यांना कोणतीही संधी देण्यासाठी थांबला नाही. कट-ऑफ वेळ संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांची होती, पण हे मैदान 20 षटकांच्या सामन्यासाठी तयार होण्याची शक्यता नव्हती. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील उद्याचा सामना आभासी बाद फेरीत बदलला आहे. यात पराभूत संघ बाहेर पडणारा तिसरा संघ असेल.

साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला, तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले होते. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तानची झोळी रिती होती. हा सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेचे प्रत्येकी 3 गुण झाले आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि अफगाणिस्तानला संधी मिळणार आहे.पण इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना करो या मरोची लढाई असेल. कारण हरणारा संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे अफगाणिस्तानचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी, तर दक्षिण अफ्रिकेचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.